Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मार्शल आर्ट स्पर्धेत कोपरगावच्या स्पर्धकांचे यश

कोपरगाव शहर ः वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे 16 ते 18 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न झालेल्या 28 व्या राज्यस्तरीय थांग ता मार्शल आर्ट स्पर्धेत अहील्यान

भंडारदरा परिसर काजवा महोत्सवासाठी सज्ज
गोदावरी नदी स्वच्छता अभियानात साई ग्रुप सक्रिय
दुकान फोडून लंपास केलेले साडेचार लाखांचे २३ मोबाईल पोलिसांनी दिले दुकानदाराला परत

कोपरगाव शहर ः वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे 16 ते 18 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न झालेल्या 28 व्या राज्यस्तरीय थांग ता मार्शल आर्ट स्पर्धेत अहील्यानगर जिल्ह्यातून कोपरगाव येथील 14 स्पर्धक सहभागी झाले होते या सर्व स्पर्धकांनी घवघवीत यश संपादन करत नावलौकिक मिळविला आहे.
या स्पर्धेत कोपरगाव येथील राष्ट्रीय सेवक संघाचे कार्यकर्ते  गणेश शिंदे यांचा मुलगा श्रावण शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विजय सांगळे यांचा पुतण्या यश सांगळे यांनी गोल्ड मेडल मिळवित यश संपादन केले आहे तर कोपरगाव तालुक्यातील सडे येथील वर्षा देठे, रवंदे येथील श्रावणी गाडे, कोपरगाव शहरातील सरस ठोळे, कोळपेवाडी येथील अथर्व सरोदे यांनी सिल्व्हर मेडल मिळविले. तर कोपरगाव येथील हर्ष धनवटे, पुष्कर बागडे, कोळपेवाडी येथील  साई महापुरे, कोकमठाण येथील अंश गंडे  यांनी ब्राँझ मेडल मिळवित घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच या स्पर्धेत विजयी झालेले कोपरगावचे यश सगळे आणि श्रवण शिंदे यांची मध्यप्रदेश राज्यातील ग्वालियर  येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या सर्व यशस्वी सर्व स्पर्धकांना महाराष्ट्र राज्य थांग ता संघटनेचे प्रमुख महागुरू  महावीर दुळधर यांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना अहिल्यानगर जिल्हा थांग ता संघटनेचे सचिव सुदर्शन पांढरे यांचे मार्गदर्शन लाभले असून या संघाचे नेतृत्व प्रशिक्षक वर्षा देठे यांनी केले. तर सहभागी आणि यशस्वी सर्व स्पर्धकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे तर  राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या दोन्ही स्पर्धकांवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS