Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काकडे कुटुंबियांकडून यशस्वी उद्योजकांचा सन्मान

श्रीगोंदा शहर : कुकडी कालव्यात सुरुंग घेऊन पाण्याला वाट मोकळी करणार्‍या चळवळीत खारीचा वाटा उचलणार्‍या लोणी व्यंकनाथ येथील पत्रकार बाळासाहेब काकडे

लायन्स क्लब कोपरगावतर्फे 100 कुटूंबाना दिवाळी फराळाचे वाटप
साकुरमध्ये दिंडीतूून जपली वारकरी संस्कृतीची परंपरा
सिद्धार्थ किसन चव्हाण यांची वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात पेटंट ऑफिसर म्हणून निवड

श्रीगोंदा शहर : कुकडी कालव्यात सुरुंग घेऊन पाण्याला वाट मोकळी करणार्‍या चळवळीत खारीचा वाटा उचलणार्‍या लोणी व्यंकनाथ येथील पत्रकार बाळासाहेब काकडे यांची माता स्व. मालनबाई धोंडीबा काकडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्ताने काकडे कुटुंबियांकडून कीर्तनाऐवजी व्याख्यानाचे आयोजन करत 12 शाळांना लेखनफळे भेट देण्यात आले.
यावेळी भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांचे वडील मधुकरराव राहणे, माजी आमदार राहूल जगताप, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, प्रतिभा पाचपुते, तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे, उद्योजक राजेंद्र नलगे, माजी सभापती सुदाम पवार, सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक संजय सातव, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतिशचंद्र सुर्यवंशी आदीसह प्रमुख मान्यवर उपिस्थत होते. यावेळी सिल्लोड येथील पुणेरी उद्योग समुहाच्या संचालिका श्रध्दा शिंदे यांनी छोटे व्यवसाय करिअरचे राजमार्ग या पहिले पुष्प गुंफले तर हभप अविनाश महाराज साळुंके यांनी आई संस्कारांचे विद्यापीठ या विषयावर दुसरे पुष्पगुंफले. यावेळी मनिषा बाळासाहेब काकडे यांनी 25 हजार, संतोष नागवडे यांनी 21 हजार तर लोणीव्यंकनाथ येथील मुस्लिम वेलफेअर फाउंडेशनने पाच हजाराची अग्नीपंखला मदत केली. यावेळी धनराज बोगावत, रमेश खुराणा, बापुराव गांजुरे, दत्तात्रय म्हस्के, राजेंद्र दंडनाईक, संतोष नागवडे, बाळासाहेब दांगट, श्रध्दा शिंदे-ढवळे, शितल माने, रामदास कांडेकर, डॉ. संतोष ओव्हळ, मुन्नाभाई शेख, उत्तम इंगळे, चंद्रकांत चौधरी मिंलीद भोयटे, सुनील ढवळे, दिलीप मुथा, शिवाजी दरंदले, नवनाथ शिंदे,चेतन कुमार शर्मा आदी यशस्वी उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. शंकर गवते यांनी केले तर आभार प्रा. धर्मनाथ काकडे यांनी मानले.

COMMENTS