कोपरगाव/प्रतिनिधी ः शेतकर्यांनी कांदा लागवडीची नोंद सात-बारा उतार्यावर केलेली नाही अथवा तलाठी यांच्या हस्ताक्षरात कांदा पीक पहाणी नमूद केली आहे
कोपरगाव/प्रतिनिधी ः शेतकर्यांनी कांदा लागवडीची नोंद सात-बारा उतार्यावर केलेली नाही अथवा तलाठी यांच्या हस्ताक्षरात कांदा पीक पहाणी नमूद केली आहे. अशा शेतकर्यांनी कांदा अनुदान प्राप्तीसाठी शासनाकडून नेमण्यात आलेल्या त्रिसदस्य समितीचा पाहणी अहवाल बाजार समितीकडे सादर करावा, असे आवाहन कोपरगाव बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक एन.जी.ठोबळ व सचिव नानासाहेब रणशुर यांनी केले आहे.
1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये ज्या शेतकर्यांनी कोपरगाव बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात तसेच शिरसगांव-तिळवणी उपबाजार आवारात कांदा विक्री केली आहे, अशा शेतकर्यांना प्रती क्विंटल 350 रूपये जास्तीत जास्त़ 200 क्विंटल प्रती शेतकरी या प्रमाणात अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी शेतक-यांच्या सात बारा उतार्यावर ई-पीक पेर्याची नोंद झालेली नाही. अशा ठिकाणी कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची शहानिशा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली गाव पातळीवर संबंधित गावाचे तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीने शेतक-यांच्या कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची पाहणी करून, शंका असल्यास आजूबाजूच्या लोकांशी चर्चा करून सत्यता पडताळून शहानिशा करावी व सात बारा उतार्यावरील नोंदीसमोर स्पष्टपणे नमुद करावे. असे प्रमाणित केलेले सात बारा उतारे कांदा अनुदानासाठी ग्राहय धरण्यात येतील. सदर समितीकडील अहवाल शेतकर्यांनी तात्काळ कोपरगांव बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाकडे सादर करावेत, विहीत मुदतीनंतर आलेल्या अहवालाचा विचार केला जाणार नाही.
COMMENTS