Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणबुडी मोटार चोरी करणारे जेरबंद

कोपरगाव तालुका पोलिस पथकाची कारवाई

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हददीतील शेतकर्‍यांच्या इलेक्ट्रीक मोटारी व शेतमाल वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कोपरगाव तालु

मागासवर्गीय ग्रामस्थांची समशान भूमीची जागा हडप करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी – अशोक गायकवाड
थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ
संजीवनी फार्मसीच्या 13 विद्यार्थ्यांना टीसीएसमध्ये नोकरी

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हददीतील शेतकर्‍यांच्या इलेक्ट्रीक मोटारी व शेतमाल वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांनी लक्ष घातले असून ग्रामीण पोलिसांचे पथक नेमून शेतकर्‍यांचा होणार्‍या चोर्‍या रोखण्यासाठी कंबर कसली असून त्याच अनुषंगाने पाणबुडी मोटार चोरी करणारे आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत.
कोपरगाव ता. पो.स्टे. गु.र.नं. 37/2024 भा.द.वि.क. 379 या दाखल गुन्हयातील फिर्यादी संपतराव राजाराम गरुड, धंदा शेती रा. बक्तरपुर ता. कोपरगाव यांच मालकिची 10 हजार रुपये किमतीची लक्ष्मी कंपनीची 5 हॉर्सपॉवरची इलेकट्रीक पाणबुडी मोटार कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीशिवाय चोरुन नेली, याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला फियांद दिली होती, त्यानुसार पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांनी आपल्या तपास पथकास योग्य त्या सूचना मार्गदर्शन केले असता त्यानुसार पोलीस पथकाने तपासाचे चक्रे फिरवुन आरोपो कृष्णा गंगाधर सानप रा. पाझर तलावाच्या खाली बक्तरपूर ता. कोपरगाव, योगेश छबन माळी रा. दहिवाडी ता. सिन्नर, हल्ली मु. बक्तरपुर ता. कोपरगाव यांना संशयावरुन ताब्यात घेऊन त्यांचेकडे अधिकची विचारपुस केली असता, त्यांनी सदरची इलेक्ट्रीक मोटारीची चोरी केल्याची कबुली देवून सदर गुन्हयात चोरुन नेलेली 10 हजार रुपये किंमतीची मोटार काढून दिली आहे. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुवर्मे,उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप कोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब वाखरे, पो.हे.कॉ संदिप बोटे, पोकॉ. अंबादास वाघ, पोकों, नवनाथ गुंजाळ, चालक पो.ना. रामा साळुंके नेमणुक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांचे पथकाने केली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक  संदिप कोळी यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हददीत अशा प्रकारचे इले, मोटार चोरीचे व शेतमालाचे गुन्हे लवकरात लवकर उघडकीस आणनार असल्याचे सांगीतले.

COMMENTS