Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाईकवरील स्टंटबाजी पडली महागात

मुंबई प्रतिनिधी - सोशल मीडियाच्या जगात तरुणांची लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्ग शोधत असतात. या रिल्स आणि सोशल मीडियाच्या नादात अनेकांच

भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या डान्सचा व्हीडीओ व्हायरल
नरसय्या आडम मास्तरांची राजकारणातून निवृत्ती
गेम चेंजर महिला नेत्या !

मुंबई प्रतिनिधी – सोशल मीडियाच्या जगात तरुणांची लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्ग शोधत असतात. या रिल्स आणि सोशल मीडियाच्या नादात अनेकांचा बळी देखील गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र तरुणाईवर याचा काहीही फरक पडताना दिसत नाही. मुंबईतही एक तरुण आणि दोन तरुणींचा बाईकवर स्टंट करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र स्टंट करणं तिघांना चांगलच महागात पडलं आहे. चौघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ वांद्रे- कुर्ला कॉम्पेक्स येथील आहे. व्हिडीओतील दृष्यांनुसार एक तरुण बाईक चालवताना दिसत आहे. तर एक तरुणी त्यांच्या मागे तर एक मुलगी त्यांच्या पुढे बसली आहे. ट्रिपल सीट बसून यांनी वाहतूक नियमांची अक्षरश: ऐसीतैसी केली. मात्र त्यांची स्टंटबाजी इथे थांबली नाही, तर मुलाने त्यानंतर वेगात असलेल्या बाईकचं पुढचं चाक वर करत व्हीली मारली. मात्र व्हिडीओ बघतात या स्टंटबाजीचा थरार तुम्हाला अनुभवता येईल. कारण या स्टंटबाजी दरम्यान एकादी चूक झाली असती तर होत्याचं नव्हतं झालं असतं.व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. चार अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक अन्सारी यांनी मुंबई पोलिसांना टॅग करत हा व्हिडिओ ट्वीट केला होता. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिसांनी भारतीय दंड संहिता 114, 279, 336 आणि 34 आणि मोटार वाहन कायद्याचे कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS