पुणे : पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विकास योजनेतील हिल टॉप-हिल स्लोप व बायो-डायव्हर्सिटी पार्क (BDP) या पर्यावरण

पुणे : पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विकास योजनेतील हिल टॉप-हिल स्लोप व बायो-डायव्हर्सिटी पार्क (BDP) या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांसाठी एकसंध आणि पर्यावरणपूरक विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यासाठी राज्य शासनाने अभ्यासगट स्थापन केला आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पुढाकारामुळे ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया सुरु झाली आहे.
पुणे महापालिकेच्या आणि पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात डोंगरमाथा-डोंगरउतार (हिलटॉप-हिलस्लोप) झोन प्रस्तावित आहे, तसेच जैववैविध्य उद्यान (BDP) आरक्षणदेखील सुचवण्यात आले आहे. या विषयावर त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश राज्यमंत्री यांनी दिले होते. परिणामी, एकत्रित व सर्वसमावेशक नियमावलीसाठी रमानाथ झा (निवृत्त सनदी अधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे. या अभ्यासगटामध्ये पुणे महापालिका आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, सहसंचालक (नगररचना), शहर अभियंता, उपसंचालक (नगररचना – नागरी संशोधन घटक) यांचा समावेश आहे. प्राप्त हरकती व सूचनांचे विश्लेषण करून उपाय सुचवणे, वापर विभाग/आरक्षण अंमलबजावणीचे मूल्यांकन, पर्यावरण समितीच्या शिफारशींचा अभ्यास, आरक्षण किंवा वापर विभागासाठी धोरणात्मक शिफारसी, शासकीय व खासगी जमिनींची सद्यस्थिती व विकास आराखडा तयार करणे, अनधिकृत विकासाबाबत शासनास दिशा दाखविणे, न्यायालयीन निर्णयांचा अभ्यास करून सुयोग्य शिफारशी मांडणे ही समितीची प्रमुख कार्ये असून, सदर समिती आपला अहवाल एका महिन्यात शासनास सादर करणार आहे.
COMMENTS