Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहावे ः पो.नि.जाधव

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत पोलिसांनी केले मार्गदर्शन

 राहुरी/प्रतिनिधीः विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अभ्यासाला महत्त्व देऊन सोशल मीडिया पासून दूर राहिले पाहिजे. मोबाईल हे दुहेरी अस्त्र आहे. चुकीच्

*आरक्षण यासंदर्भात काँग्रेसच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; केली ‘ही’ मागणी | LokNews24
बदलापूर अत्याचारग्रस्त बालिकांना न्याय द्या
स्वामी विवेकानंदांच्या आदर्शांचे आणि विचारांचे महत्त्व तरुणांमध्ये रुजवणे आवश्यक – डॉ अभिमन्यू ढोरमारे

 राहुरी/प्रतिनिधीः विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अभ्यासाला महत्त्व देऊन सोशल मीडिया पासून दूर राहिले पाहिजे. मोबाईल हे दुहेरी अस्त्र आहे. चुकीच्या पोस्ट फॉर्वड केल्यामुळे अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपले करियर यावर लक्ष देऊन जीवनात यशस्वी व्हावे. असे वक्तव्य राहूरी स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धंनजय जाधव यांनी केलेे.
राहुरी येथील कै.लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य कैलास अनाप हे होते.पो.नि.जाधव पुढे म्हणाले की, जिद्द,चिकाटी व शिस्त ज्याचेकडे असेल तो विद्यार्थी कितीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करतो व जीवनात यशस्वी होतो. या देशातील कायदे हे आपण बनवले त्याचे पालन करणे आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. पोलिसांविषयी मनात भीती बाळगू नये. पोलिस हा कायद्याची अंमलबजावणी करून देशातील नागरिकांच्या मालमता व जीविताचे रक्षण करतो. मोबाईलच्या फसव्या दुनियेपासून विद्यार्थ्यांनी स्वतःला दूर ठेवावे, देशाचे सर्व राष्ट्रपुरुष आपला आदर्श आहेत, त्यांचे विचारावर आपण चालतो, त्यांचे योगदान विसरू नका. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रपुरुषांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई केली जाते. अनोळखी लोकांशी मैत्री करणे टाळावे, आपली आई-वडील, आपला भाऊ-बहीण यापेक्षा चांगला मित्र कुणी नसतो. जे आईवडील जीवापाड प्रेम करून आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं यासाठी मनापासून प्रयत्न करतात. त्यांना अपमानित करू नका. त्यांना समाजात मान खाली घालवी लागेल असे कृत्य करू नका. विशेषतः मुलींनी या बाबत अत्यंत सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले.मोबाईल हे दुहेरी अस्त्र आहे. चुकीच्या पोस्ट फॉर्वड केल्यामुळे अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपण कुणाला काय पाठवतोय, कुणाशी काय बोलतोय याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवलं पाहिजे.अनेक मुली घरातून सोशल मीडियावर ओळख झालेल्या दूरच्या, मुलांबरोबर निघून जातात. तेव्हा पालकांना पश्‍चात्ताप करण्याची वेळ येते. त्यामुळे सद्वविवेक जागृत ठेवून मुलींनी वर्तन केले पाहिजे. एखादी दुर्घटना घडली तर कायदा सोडत नाही.आयुष्यातील पुढील सोनेरी संधींना यामुळे मुकावे लागले. याच भान विद्यार्थी आणि पालकांनी ठेवले पाहिजे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य कैलास अनाप यांनी केले. आभार प्रा. रवींद्र घनवट यांनी मानले. यावेळी बाल विद्यामंदिरचे मुख्याध्यापक गुलाब मोरे, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS