घारगाव/प्रतिनिधी ः साईकृपा कृषी महाविद्यालय घारगाव येथे गणेशोत्सवानिमित्त व्याख्यान पुष्प मालेचे आयोजन करण्यात आले होते, या अंतर्गत सेन्ट्रल बॅक
घारगाव/प्रतिनिधी ः साईकृपा कृषी महाविद्यालय घारगाव येथे गणेशोत्सवानिमित्त व्याख्यान पुष्प मालेचे आयोजन करण्यात आले होते, या अंतर्गत सेन्ट्रल बॅक ऑफ इंडिया, शाखा पिंपळगाव पिसा येथील सहाय्यक शाखा प्रबंधक संदिप टुले यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित संदीप टुले याचे स्वागत व सत्कार साईकृपा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ निंबाळकर यांनी केले.
आपल्या मार्गदर्शन पर व्याख्यानात टुले यांनी बीएस्सी कृषी प्रथम वर्ष ते बॅकचे सहाय्यक शाखा प्रबंधक हा जीवन प्रवास स्पष्ट केला. तसेच त्यांनी विद्यार्थींना वेळेचे व्यवस्थापन तसेच स्वंयस्पूर्ती सह प्रेरणा घेत अभ्यास करून यश संपादन करण्याचा सल्ला दिला, तसेच आपले आशा, अंकाक्षा, इच्छा यांचे मुख्य आधार स्तंभ हे आपले पालक असल्यामुळे त्यांच्या कष्टाची जाण राखणे हीच आपली श्रद्धा असावी असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन कु.अंकिता गाडेकर या विद्यार्थींनीने केले. या साईकृपा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ निंबाळकर सर यांनी अभ्यास क्रांतीची मशाल तेवत ठेवून यश प्राप्त करण्याचा सल्ला दिला. या वेळी साईकृपा कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर हेही उपस्थित होते. तसेच महाविद्यालयचे इतर प्राध्यापक गोंधळी, पाठक, निकम, केदारे, पगार तसेच प्राध्यापिका गायकवाड, साळवे, भोसले , फुंदे, साळुंखे, जाधव तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्री. दत्तकृपा शैक्षणिक व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.दत्तात्रय पानसरे साहेब व सचिव आदरणीय अर्चनाताई पानसरे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
COMMENTS