Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘संत ज्ञानेश्वर’च्या विद्यार्थ्यांची शिर्डी विमानतळास भेट

कोपरगाव : पुस्तकातील विमानाची चित्रे पाहणाऱ्या कोपरगावच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात विमानाचे टेक-ऑफ आणि लँडिंग अनुभवले. कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला (काकडी) शैक्षणिक भेट दिली. विमानतळ प्राधिकरणाने या भेटीला विशेष परवानगी दिली होती, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना विमानतळाच्या अंतर्गत कामकाजाची सखोल माहिती घेता आली.  संस्थेचे अध्यक्ष  राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी संचालक विशाल झावरे यांच्या नेतृत्वाखाली व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांच्या संकल्पनेतून ही भेट आयोजित करण्यात आली होती. विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने विद्यार्थ्यांना विमानतळावरील विविध विभागांची माहिती देण्यात आली. यामध्ये प्रवेश आणि तिकीट प्रक्रिया: प्रवाशांचे तिकीट चेकिंग आणि बोर्डिंग पासची प्रक्रिया कशी चालते, विमानतळावर येणारे आणि जाणारे प्रवासी यांचे नियोजन कसे केले जाते, धावपट्टीचे तंत्र आणि विमानाचे उड्डाण, विमानाचे लँडिंग आणि टेक-ऑफ होतानाचे दृश्य विद्यार्थ्यांनी अनुभवले. विमानतळ अधिकाऱ्यांनी धावपट्टीचे व्यवस्थापन आणि विमानांच्या सिग्नल यंत्रणेबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.  भारतीय सुरक्षा दलांचे महत्त्व, शिस्त आणि विमानतळाची चोख सुरक्षा व्यवस्था याबद्दल जवानांनी दिलेल्या माहितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना अधिक दृढ झाली. केवळ विमान पाहणेच नव्हे, तर विमानचालन एवीएशन क्षेत्रात करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, वैमानिक, एअर होस्टेस आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर कसे होता येते, याबद्दलही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या यशस्वी भेटीबद्दल संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे पाटील,कार्यकारी संचालक विशाल झावरे, मुख्याध्यापक सचिन मोरे व उपमुख्याध्यापिका वैशाली लोखंडे यांनी विमानतळ प्राधिकरणाचे आभार मानले.

शेतकऱ्यांच्या बांधावरच न्याय निवाड्याचा ‘कोपरगाव पॅटर्न’; शेतशिवार रस्त्यांचे ७५ वाद ‘बांधावरच’ निकाली; ६० हून अधिक किमीचे रस्ते खुले
पोलिसावर हल्ला करणाऱ्यांची शहरातून धिंड
देवळाली प्रवरात ‘श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज’ यात्रोत्सव

कोपरगाव : पुस्तकातील विमानाची चित्रे पाहणाऱ्या कोपरगावच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात विमानाचे टेक-ऑफ आणि लँडिंग अनुभवले. कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला (काकडी) शैक्षणिक भेट दिली. विमानतळ प्राधिकरणाने या भेटीला विशेष परवानगी दिली होती, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना विमानतळाच्या अंतर्गत कामकाजाची सखोल माहिती घेता आली.

 संस्थेचे अध्यक्ष  राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी संचालक विशाल झावरे यांच्या नेतृत्वाखाली व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांच्या संकल्पनेतून ही भेट आयोजित करण्यात आली होती. विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने विद्यार्थ्यांना विमानतळावरील विविध विभागांची माहिती देण्यात आली. यामध्ये प्रवेश आणि तिकीट प्रक्रिया: प्रवाशांचे तिकीट चेकिंग आणि बोर्डिंग पासची प्रक्रिया कशी चालते, विमानतळावर येणारे आणि जाणारे प्रवासी यांचे नियोजन कसे केले जाते, धावपट्टीचे तंत्र आणि विमानाचे उड्डाण, विमानाचे लँडिंग आणि टेक-ऑफ होतानाचे दृश्य विद्यार्थ्यांनी अनुभवले. विमानतळ अधिकाऱ्यांनी धावपट्टीचे व्यवस्थापन आणि विमानांच्या सिग्नल यंत्रणेबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

 भारतीय सुरक्षा दलांचे महत्त्व, शिस्त आणि विमानतळाची चोख सुरक्षा व्यवस्था याबद्दल जवानांनी दिलेल्या माहितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना अधिक दृढ झाली. केवळ विमान पाहणेच नव्हे, तर विमानचालन एवीएशन क्षेत्रात करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, वैमानिक, एअर होस्टेस आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर कसे होता येते, याबद्दलही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या यशस्वी भेटीबद्दल संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे पाटील,कार्यकारी संचालक विशाल झावरे, मुख्याध्यापक सचिन मोरे व उपमुख्याध्यापिका वैशाली लोखंडे यांनी विमानतळ प्राधिकरणाचे आभार मानले.

COMMENTS