Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुणदर्शन स्पर्धेत खिर्डी गणेशचे विद्यार्थी चमकले

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुका शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा साकरवाडी येथे तालुकास्तरीय सांस्कृतिक व विविध गुणदर्शन स्पर्धांचे आय

एक कोटींहून अधिक मुस्लिम भाजपसोबत जोडणार
अहमदनगर जिल्ह्यात पुढील १४ दिवस जनता कर्फ्यू : हसन मुश्रीफ
मुस्लिम समाजाने घेतले आमरण उपोषण मागे

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुका शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा साकरवाडी येथे तालुकास्तरीय सांस्कृतिक व विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत खिर्डी गणेश येथिल  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्कर वस्ती यांनी एकूण बक्षीसां पैकी चार बक्षीस मिळवले आहेत. किलबिल गट हस्ताक्षर स्पर्धा प्रथम क्रमांक श्‍लोक रोहम, वैयक्तिक गीत गायन किलबिल गट प्रथम क्रमांक वैष्णवी जाधव, बालगट प्रथम क्रमांक वैयक्तिक गीत गायन अद्वैत भास्कर आणि वेशभूषामध्ये बालगटात दुर्वा हर्षल आहेर यांनी प्रथम क्रमांक  पटकावला केला आहे.कोपरगावचे प्रतिनिधी म्हणून ते जिल्हास्तरावर कोपरगावचे नेतृत्व करणार आहे. त्यांच्या या अशाबद्दल त्यांचे व शिक्षक वृंद यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

COMMENTS