Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने घेण्याच्या मागणीसाठी शिवाजी विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन

कोल्हापूर / प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने घ्याव्यात, या मागणीसाठी विद्यार्थी काँग्रेस (एनएसयुआय) व युवक काँग

Nashik : भगवा झेंडा फडकवायच्या कामाला लागा
फलटणला होणारे राष्ट्रीय सामने यशस्वी पार पडतील : श्रीमंत रामराजे
दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी l DAINIK LOKMNTHAN

कोल्हापूर / प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने घ्याव्यात, या मागणीसाठी विद्यार्थी काँग्रेस (एनएसयुआय) व युवक काँग्रेसतर्फे बुधवारी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी धडक मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना देण्यात आले. दरम्यान, आ. ऋतुराज पाटील यांनी कुलगुरूंशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या भावनांचा विचार करावा, असे आवाहन केले.
शिवाजी विद्यापीठाचे बहुतांश अभ्यासक्रम ऑनलाईन पध्दतीने शिकवले आहेत. मात्र, परीक्षा जवळ आली असताना त्या पध्दतीत बदल करून विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकले आहे. मुंबई विद्यापीठ व्यावसायिक अभ्यासक्रम ऑनलाईन परीक्षा पध्दत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली या विद्यापीठांत एमसीक्यू परीक्षा पध्दतीचा अवलंब केला जाणार आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या दीर्घोत्तरी परीक्षा पध्दतीमुळे विद्यार्थी प्रवेश, नोकरी अशा ठिकाणी मागे राहतील. त्यामुळे परीक्षा इतर विद्यापीठांप्रमाणे ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात ‘एनएसयूआय’चे अध्यक्ष अक्षय शेळके, युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय पोवार, दीपक थोरात, उमेश पाडळकर, आदित्य कांबळे, मुबीन मुश्रीफ, विनायक पाटील, सत्यजित पाटील, अभिजित भोसले यांच्यासह एनएसयूआयचे कार्यकर्ते व विद्यार्थी सहभागी झाले होते.

COMMENTS