Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंजारा ब्रिगेड च्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

गेवराई प्रतिनिधी - बंजारा शिक्षण सेवा अभियान तसेच बंजारा ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या वतीने पुणे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये बंजारा समाजातील गुणवंत

राष्ट्रपिता महात्मा गांधी हे जगाचे शांतीदूत : आमदार डॉ.सुधीर तांबे
गरोदर महिलेच्या अंगावरून गेला उसाची ट्रैक्टर ट्रॉली
कार अपघातातील आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार

गेवराई प्रतिनिधी – बंजारा शिक्षण सेवा अभियान तसेच बंजारा ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या वतीने पुणे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला गेला होता यानिमित्ताने बंजारा समाजातील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विविध वर्गामध्ये प्राविण्य मिळवलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा गुणगौरव बंजारा शिक्षण सेवा अभियान तसेच बंजारा ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर करण्यात आला समाजातील गुणवंत विद्यार्थी हे विविध क्षेत्रांमध्ये उच्च पातळीवर पोहोचले पाहिजे या उद्देशाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे या निमित्ताने हा सोहळा आयोजित केला होता या निमित्त नवनियुक्त कर सहाय्यक अधिकारी कविता राठोड दशरथ पवार यांचा सन्मान करण्यात आला या सोहळ्यासाठी बंजारा शिक्षण सेवा अभियानाचे राष्ट्रीय प्रचारक तथा बंजारा धर्मगुरू धर्मप्रचारक आदरणीय रमेश महाराज पोहरागड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असलेल्या कार्यक्रमात बंजारा शिक्षण सेवा अभियानाचे मुख्य समन्वयक बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रविकांत भाऊ राठोड हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते यावेळी समाजातील उच्चपदस्त अधिकारी निवृत्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश नामदेव चव्हाण सर माऊली हॉस्पिटलचे संचालक प्राध्यापक डॉ साहेबराव राठोड सर भारती विद्यापीठ चे प्राचार्य गणेश चव्हाण पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण संभाजी राठोड व्यंकट चव्हाण तुकाराम खेतावत उखऊ दत्तात्रय पवार शेरसिंग पवार तसेच बंजारा शिक्षण सेवा अभियान चे पुणे विभागीय समन्वयक सूर्यकांत राठोड विभागीय अध्यक्ष जयवंत राठोड लातूर विभागीय अध्यक्ष सुरेश राठोड जिल्हाध्यक्ष मुकेश राठोड, पुणे जिल्हा समन्वयक विजय राठोड जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रताप राठोड, वाशिम येथील सामाजिक कार्यकर्ते रोशन राठोड, मुळशी तालुका अध्यक्ष महेश खेतावत, तालुका अध्यक्ष राहुल जाधव राजेंद्र चव्हाण खंडाळा तालुका अध्यक्ष सुरेश राठोड नितीन चव्हाण संतोष राठोड चित्रपट अभिनेता रामेश्वर चव्हाण आणि निकिता जाधव आणि मोठ्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित होते.. या सोहळ्याच्या निमित्ताने बंजारा शिक्षण सेवा अभियान पिंपरी चिंचवड शहर समन्वयक पदी प्रमोद जाधव , हवेली तालुका समन्वयक पदी बळीराम राठोड बंजारा ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्षपदी उद्योजक मनोज राठोड , विभागीय सह समन्वयक पदी दीपक चव्हाण यांची सर्वानुमते बंजारा ब्रिगेड चे राष्ट्रिय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड यांच्या हस्ते निवड करण्यात आली आणि आणि सर्व विद्यार्थी यांचा ट्रॉफी सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय राठोड आणि दिलीप जाधव केले सूत्रसंचलन सूर्यकांत राठोड यांनी तसेच आभार प्रदर्शन प्रताप राठोड यांनी केले.

COMMENTS