Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुमठा खुर्द येथे बसच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

उदगीर प्रतिनिधी - तालुक्यातील कुमठा खुर्द येथे शुक्रवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास एका पंधरा वर्षीय शालेय विद्यार्थ्यास बसने धडक दिल्याची घटन

विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात
भीषण अपघात ! वारकऱ्यांची ट्रक झाली पलटी
छत्तीसगडमध्ये नवरा-नवरीसह 5 जणांचा मृत्यू

उदगीर प्रतिनिधी – तालुक्यातील कुमठा खुर्द येथे शुक्रवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास एका पंधरा वर्षीय शालेय विद्यार्थ्यास बसने धडक दिल्याची घटना घडली. यामध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, बसचालकाविरुद्ध रविवारी उदगीर ग्रामीण पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील कुमठा खुर्द येथे शुक्रवारी एम.एच. 14 बी.टी. 1993 क्रमांकाच्या बसचालकाने गावातील विद्यार्थी धनराज गोपाळ केंद्रे (वय 15) हा सायकल वरून शाळेतून येत असताना त्यास जोराची धडक दिली. जखमी विद्यार्थ्यांला उपचारासाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतू, रविवारी मयत विद्यार्थ्याचे काका विष्णू लक्ष्मण केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक माधव धोंडीबा उडतेवार यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरगोजे करीत आहेत.

COMMENTS