Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री नेमिनाथ जैन विद्यालयात विद्यार्थी आरोग्य तपासणी संपन्न

चांदवड - प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड येथील आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहयोगाने श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 2

कांद्यासह भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने शेतकरी अडचणीत
नगरसेवकाची धमकी , ”तू आमच्या विरोधात गेलास तर तलवारीने तुकडे करिन… | LOK News 24
काळा बाजार करणार्‍यांच्या नातेवाइकांकडून घेतलेली पार्टी अंगलट

चांदवड – प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड येथील आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहयोगाने श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 2600 विद्यार्थांची आरोग्य तपासणी झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली. सध्या वातावरणातील सातत्याने बदल होत आहे त्या अनुषंगाने लहान मुलांमध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. या साठी विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी सवयींचा अवलंब करावा आणि साथीच्या आजारांपासून दूर राहावे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड येथील तज्ञ डॉ. दिपेश रसाळ, डॉ.स्वप्निल वेरुळकर, डॉ.प्रज्ञा पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील 2600 विद्यार्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आढळून आलेल्या लक्षणांवर प्राथमिक तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.

या विद्यार्थी हिताच्या उपक्रमाचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र  पारख यांनी कौतुक केले.

तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थांची आरोग्य तपासणी व्हावी यासाठी विद्यालयाचे उपप्राचार्य संदिप समदडिया, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील, ज्येष्ठ शिक्षक देवेंद्रराज जैन यांचा मार्गदर्शनाखाली विद्यालयातील 

विद्यार्थी आरोग्य विभाग प्रमुख सविता शिंदे, शुभांगी ब्राह्मणकर, सोनम कुकर  यांनी यश यशस्वी नियोजन केले.

COMMENTS