दसरा मेळाव्याचा संघर्ष !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

दसरा मेळाव्याचा संघर्ष !

गेली ५३ वर्ष ज्या शिवसेनेचा आवाज दादरच्या शिवाजी पार्क मधून केवळ घुमत नाही तर, महाराष्ट्राला साथ घालतो आणि त्या सादेला प्रतिसाद देत महाराष्ट्राचा बहु

आंबेडकर, मायावती, ओवैसी यांची वेगळी वाट त्यांनाच नुकसानदायक ! 
वीस कोटी मतदार करणार आज निर्णायक मतदान ! 
मूलभूत हक्क असूनही पर्सनल डेटा विधेयक! 

गेली ५३ वर्ष ज्या शिवसेनेचा आवाज दादरच्या शिवाजी पार्क मधून केवळ घुमत नाही तर, महाराष्ट्राला साथ घालतो आणि त्या सादेला प्रतिसाद देत महाराष्ट्राचा बहुजन समाज आजपर्यंत शिवसेनेमध्ये संघटित राहिला. शिवसेना ही संघटना होती; परंतु त्यातून उद्भवलेला राजकीय अनुशेषाचा प्रश्न हा महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या अस्मितेचा धागा बनला होता आणि म्हणून उत्तरोत्तर शिवसेना राजकारणात यशस्वी होत गेली.    जेव्हा उत्तर भारतात समाजवादी पक्ष सत्तेवर आला, त्यावेळी महाराष्ट्रात हे म्हटले जात होते की, शिवसेना हा देखील बहुजनांचा पक्ष आहे. कारण त्यात सर्वस्वी बहुजन समाजाची किंवा जातीची लोक आहेत. परंतु शिवसेनेने नारा मात्र हिंदुत्वाचा दिला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला वाढवताना सुरुवातीपासून वेगळी भूमिका जरी घेतली तरी भाषेचा, कधी प्रांताचा वाद उभा केला असला तरी शिवसेनेचे संघटन किमान मुंबई प्रदेशात आकाराला येत गेले. त्यांनी घेतलेले हिंदुत्व हे आरएसएसने घेतलेल्या हिंदुत्वाशी वेगळे आहे, ही गाठ मात्र त्यांच्या मनाशी ठाम होती. त्यामुळे त्यांच्या काळात ते हुकमी असणारं नेतृत्व राहिलं. भाजप अखिल भारतीय पक्ष असतानाही शिवसेनेच्या साथीला मात्र महाराष्ट्रात छोट्या भावाच्या भूमिकेतच भाजपा राहिला होता. 
     मात्र, आज शिवाजी पार्कवर या ५३ वर्षापासून शिवसेनेचा आवाज गुंजतो आहे. तो आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे का? असा कोणी प्रश्न केला तर त्याचे उत्तर आहे की, जेव्हा एकाच पक्ष अथवा संघटनेचे दोन भाग होतात तेंव्हा ते दोन्ही भाग एकमेकांना संपवण्याचा प्रयत्न करतात; हे वास्तव चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे थोर विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी मांडले आहे. शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेला आवाजाचा डेसिबल हे परिमाण लावले गेले आहे. या डेसिबल मध्ये राहूनही शिवसेनेला दसरा मेळाव्याची  नाकारण्यात येत असलेली परवानगी ही अजून तांत्रिक बाबीत असली तरी प्रयत्न त्या दिशेने होत आहे. आणि मग हा प्रयत्न नेमका का होत आहे? याची कारण मीमांसा मराठी माणसाला किंवा शिवसेनेचा धागा असलेल्या बहुजन समाजाच्या माणसाला आता उमगलेला आहे. आणि म्हणून शिवसेनेने प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांच्या वारसालाच आता पुढे नेण्याची अशी जाहीर भूमिका शिवसेनेच्या अनुयायांमधून, विचारवंतांमधून, कार्यकर्त्यांमधून आता पुढे येत आहे. आणि या भूमिकेला सध्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या शब्दात जो भाव दिला होता तो म्हणजे, ‘आमचे हिंदुत्व हे शेंडी जाणवण्याचे नाही’, या एकाच ओळीत प्रबोधनकारांशी त्यांनी आपला इतिहास जोडून घेतला. परंतु, यातून हा संघर्ष उभा राहिला नाही तर त्याचा अर्थ शिवसेना आताही पक्ष किंवा संघटना म्हणून जी काही उभी आहे, ती संघटकांच्या ताकदीवर. शिवसेनेला ज्यांनी वाढवलं त्या संघटकांनाच शिवसेनेने पक्षाची तिकीटे दिली. त्यातून त्यांचे आमदार, खासदार वाढले. परंतु, आता त्या संघटक नेत्यांनाच शिवसेना ताकद दाखवण्याचा प्रयत्न करित असेल तर त्यास तीव्र प्रतिक्रिया येईलच, हाच शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळावा संदर्भातील खरा संघर्ष आहे. शिवसेना ही मुळात एक संघटना होती. त्याचा पक्षाच्या वटवृक्षात झालेले रूपांतर ही त्यातील कार्यकर्त्यांची ताकद होती. ही ताकद आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेली आहे. 

COMMENTS