Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बलवान युवा पिढी हीच खरी देशाची संपत्ती : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

पुण्याचा तौसिफ मोमीन ’बाबाराजे श्री’ चा मानकरीसातारा / प्रतिनिधी : आपण बर्‍याचदा ’आरोग्यम धनसंपदा’ असे ऐकत असतो. शरीर बलवान आणि तंदरुस्त असणे ही

रोनाल्डोला मिळाला नवा संघ
जसप्रीत बुमराह च्या फॅमिलीत आला‌ नवा चिमुकला
कुस्ती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज : पैलवान संभाजीराव लोंढे

पुण्याचा तौसिफ मोमीन ’बाबाराजे श्री’ चा मानकरी
सातारा / प्रतिनिधी : आपण बर्‍याचदा ’आरोग्यम धनसंपदा’ असे ऐकत असतो. शरीर बलवान आणि तंदरुस्त असणे ही एक मोठी संपत्ती आहे. शरीर तंदरुस्त असेल तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. बलवान युवा पिढी हीच खरी देशाची संपत्ती असून युवावर्ग व्यसनापासून दूर ठेवणे आणि तो शारीरिकदृष्ट्या तंदरुस्त असणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
निशिकांत पिसाळ आणि बाळासाहेब भुजबळ मित्रसमूहातर्फे राजवाडा गांधी मैदान येथे ’बाबाराजे श्री 2022’ पश्‍चिम विभाग शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी निशिकांत पिसाळ, बाळासाहेब भुजबळ, पश्‍चिम महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र हेंद्रे, दिलीप धुमाळ, महेश गणगे, मुरली वत्स, संदीप यादव, दीपक माने, नगर विकास आघाडीचे सर्व आजी-माजी माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह विविध मान्यवरांसह मित्रसमूहाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा विजेता भारतीय सैन्य दलाचा खेळाडू अनुज तालियान हाही उपस्थित होता. त्याच्या प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यातून 80 स्पर्धक सहभागी झाले होते. पुण्याच्या तौसिफ मोमीन याने बाबाराजे श्री 2022 हा ’किताब पटकावला. कोल्हापूरच्या ऋषिकेश वगरे याने बेस्ट पोसिंग तर सातारच्या रामा मैनाक याने मोस्ट मस्क्युलर ’किताब मिळवला. सहा वजन गटात झालेल्या या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.

COMMENTS