मनपा पतसंस्था व झेडपी सोसायटी निवडणुकीत जोरदार शक्तीप्रदर्शन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपा पतसंस्था व झेडपी सोसायटी निवडणुकीत जोरदार शक्तीप्रदर्शन

अहमदनगर/प्रतिनिधी ः मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था आणि जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत सोमवारी (22 नोव्हेंबर) अखेरच्या दिवशी उमेदवारांनी श

पतसंस्था चालविताना घ्यावयाची दक्षता यावर विचार मंथन बैठक
देवठाण येथील शिबिरातून 46 बॅगचे रक्तसंकलन
आ. आशुतोष काळेंकडून कोल्हे गटाला पुन्हा धक्का

अहमदनगर/प्रतिनिधी ः मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था आणि जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत सोमवारी (22 नोव्हेंबर) अखेरच्या दिवशी उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मनपा पतसंस्थेच्या 15 जागांसाठी 93 तर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या 21 जागांसाठी 186 अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची आज मंगळवारी (23 नोव्हेंबर) छाननी होणार आहे.
मनपा कर्मचारी पतसंस्था व जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी या दोन्ही संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. त्यामुळे मनपा आणि जिल्हा परिषद कर्मचार्‍यांमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दि. 15 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती व सोमवारी उमेदवारी दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर 24 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत उमेदवारी माघारीची मुदत असून, 18 डिसेंबरला मनपा पतसंस्थेसाठी व 19 डिसेंबरला जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर 19 डिसेंबरला मनपा पतसंस्थेची व 20 रोजी जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची मतमोजणी होणार आहे. मनपा पतसंस्थेच्या 15 तर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. मनपा पतसंस्थेसाठी बाबासाहेब मुदगल आणि जितेंद्र सारसर यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर त्यांच्या विरोधात जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज पॅनलचे प्रमुख केलास भोसले यांच्या नेतृत्वाखाली भरले.
सहकार पॅनलमध्ये सर्वसाधारण गटातून बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाळासाहेब पवार, अजय कांबळे, कैलास चावरे, सतीश ताठे, श्रीधर देशपांडे, विकास गीते, विजय कोतकर, बलराज गायकवाड, महिला राखीव गटामधून प्रमिला पवार, उषा वैराळ, इतर मागास प्रवर्ग गटामधून किशोर कानडे, अनुसूचित जाती जमाती गटामधून गुलाब गाडे तर इतर भटक्या विमुक्त जाती गटामध्ये बाळासाहेब गंगेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर जनसेवा पॅनेलचे उमेदवार सर्वसाधारण गटामधून कैलास भोसले,प्रकाश आजबे,राजेंद्र शिरसाठ,गणेश लायचेटी,बाळू विधाते, अशोक कराळे,महादेव कोतकर,नरेंद्र पेवाल,प्रशांत चादणे,ऋषिकेश लखापती, महिला राखीव नंदा भिगारदिवे,काळे भीमाबाई,अनु.जाती-जमाती चे उमेदवार प्रसाद उमाप,इतर मागास वर्गचे उमेदवार राहुल साबळे ,भटकेविमुक्त जाती-जमातीचे उमेदवार बाबासाहेब राशीनकर आदींनी उमेदवारी अर्ज भरले.

COMMENTS