Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंबिजळगावमधून तुतारीला जोरदार पसंती : हभप बापूराव निकत

कर्जत : आंबिजळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. तुतारी हे चिन्ह मतदारांमध्य

ब्राम्हणीतून एकाची मोटारसायकल पळवली
पाटबंधारे विभागाने शेतक-यांचा अंत पाहु नका ; अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही : कोल्हे
कोपरगाव शहरातील शिबिरात 135 रुग्णांची तपासणी

कर्जत : आंबिजळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. तुतारी हे चिन्ह मतदारांमध्ये पोहोचवण्यात कार्यकर्त्यांना यश आले असल्याने तुतारीला आंबिजळगावमधून जोरदार पसंती दिली जात आहे, असे प्रतिपादन हभप बापूराव निकत यांनी केले. आंबिजळगाव येथील बैठकीत ते बोलत होते.
नवीन चेहर्‍यांना संधी मिळाली पाहिजे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नगर दक्षिणमध्ये पारनेर मतदारसंघाचे माजी आ. निलेश लंके यांची निवड करण्यात आली आहे. अडचणीच्या काळात सर्वसामान्य जनतेला सहकार्य करणार्‍या नेत्याला पसंती द्यावी. मतदारांनो, मतदानाला जाताना तुमच्या खतांच्या गोणीकडे पहा, कारण खतांच्या किमतीत वाढ झाली आहे. दुधाचे भाव तर पाण्यापेक्षा कमी करुन ठेवले आहे. याचा मतदान करताना नक्की विचार करा, असे विचार हभप निकत यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंखे, कैलास शेवाळे, किरण पाटील, रघुआबा राळेभात, सपकाळ सर, बापूसाहेब काळदाते, निकत, अनिल निकत, प्रा. भांडवलकर, सुबराव निकत, अनिल अनारसे, सुदाम निकत, कांतीलाल लोंढे, बाबुराव निकत, लक्ष्मण महाराज निकत यांच्यासह मोठ्या संख्येने गावातील कार्यकर्ते उपस्थित होते

COMMENTS