तिरूअनंतपूरम :बाल लैंगिक शोषण म्हणजे नेमके काय? यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश करता येईल यासंदर्भात अजूनही पुरेशी स्पष्टता नाही. मात्र या
तिरूअनंतपूरम :बाल लैंगिक शोषण म्हणजे नेमके काय? यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश करता येईल यासंदर्भात अजूनही पुरेशी स्पष्टता नाही. मात्र यासंदर्भात नव-नवीन निकालांनी याासंदर्भात स्पष्टता येतांना दिसू येत आहे. त्यातच अल्पवयीन मुलांसमोर शारीरिक संबंध ठेवणे किंवा विवस्त्र होत त्यांच्यापुढे अंगप्रदर्शन करणे हा लैंगिक अत्याचाराचाच प्रकार असल्याचे महत्वपूर्ण निरीक्षण केरळ उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत वरील कृती दंडनीय अपराध असल्याचंही न्यायालयाने अधोरेखित केलं. न्यायमूर्ती ए बदरुद्दीन यांनी महत्त्वाच्या याचिकेवरील सुनावणीवेळी हा निकाल दिला.
भारतीय दंडसंहिता, पॉक्सो कायदा आणि किशोर न्याय अधिनियमाअंतर्गत विविध गुन्हांवरील तक्रारी आणि प्रकरणे रद्दबातल करणार्या याचिकेवर हा निकाल देण्यात आला. सदर प्रकरणात एका व्यक्तीवर आरोप करण्यात आले होते की, त्याने खोलीचे दार न लावता एका लॉजमध्ये अल्पवयीन मुलाच्या आईशी शारीरिक संबंध ठेवले. ज्यानंतर हे कृत्य पाहणार्या त्या लहान मुलाने या सार्याबाबत प्रश्न विचारताच या व्यक्तीने त्याला मारहाण केली. आरोपी-याचिकाकर्त्याच्या दाव्यानुसार आपल्याविरोधात कोणत्याही गुन्हाची नोंद होऊ नये असे म्हटले गेले. याच अतिशय संवेदनशील मुद्द्यावर निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने मांडलेल्या भूमिकेनुसार कोणाही व्यक्तीकडून एखाद्या लहान मुलाला विवस्त्र शरीर दाखवल्यास ते कृत्य मुलाच्या लैंगिक शोषणहेतू केले गेलेले कृत्य ठरते. ज्यासाठी पॉक्सोच्या 11 (ख) (लैंगिक शोषण), कलम 12 (लैंगिक शोषण प्रकरणी दंड) अंतर्गत दंडनीय गुन्ह्याची नोंद केली जाते.
COMMENTS