Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बियाणे, खते विक्रीत लिंकिंग केल्यास कठोर कारवाई होणार

लातूर प्रतिनिधी - जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप हंगामात उच्च प्रतीचे बियाणे, खते मिळवीत, यासाठी कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्रांना विविध सूचना

अहमदाबाद-तिरुचिरापल्ली साप्ताहिक विशेष रेल्वे
जिल्ह्यातील 2 हजार 620 महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
लोहा- कंधार मतदारसंघातील घराणेशाही थांबविण्यासाठी एकनाथ दादा पवार यांना विधानसभेत पाठवा 

लातूर प्रतिनिधी – जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप हंगामात उच्च प्रतीचे बियाणे, खते मिळवीत, यासाठी कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्रांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांच्या अंमलबजावणीची आढावा घेण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांनी अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रांना भेटी देवून तेथील बियाणे, रासायनिक खतांच्या साठ्याची तपासणी केली. तसेच यापुढे इतरही ठिकाणी अचानक कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बियाणे, खते विक्री करताना लिंकिंग केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी पी. पी. देवकते, अहमदपूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी आयलवार यावेळी त्यांच्या सोबत होते. शेतक-यांना चांगल्या प्रतीचे बियाणे, खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिल्या आहेत. त्यानुसार कृषी विभागामार्फत नियोजन व उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातील कृषीं सेवा केंद्र चालकांनी शेतक-यांना चांगल्या प्रतीचे बियाणे, खते उपलब्ध करुन द्यावीत. तसेच बियाणे, खते विक्री करताना लिंकिंग करु नये, चढ्या दराने विक्री करु नये. कृषी सेवा केंद्रात उपलब्ध बियाणे आणि खतांचा साठा, त्यांचे दर दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्या असल्याचे जिल्हा अधीक्षककृषी अधिकारी रक्षा शिंदे यांनी सांगितले. लिंकींग अथवा चढ्या दराने खते, बियाणे विक्री करणा-या कृषी सेवा केंद्रांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येणार असून याबाबत सर्व कृषी सेवा केंद्रांना अवगत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याबाबतच्या शेतक-यांच्या तक्रारी नोंदवून घेण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या तक्रारींची दखल घेवून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी भरारी पथकेही स्थापन केली असल्याचे श्रीमती शिंदे यांनी सांगितले.

COMMENTS