Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाडक्या बहिणींची पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये तुफान गर्दी

बँकांना यात्रेचे स्वरूप काउंटर वाढवण्याची मागणी

राहाता ः लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा,  काल 15 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यामध्ये जमा झाला आहे. तर काही

बायोडिझेल कारवाईचा मागवला अहवाल ; पोलिस अधीक्षक पाटील यांचे कोतवालीला आदेश
महावितरणचा शॅाक! १७ पाणी पुरवठा योजना बंद; आमदार करतात काय ?: माजी आमदार स्नेहलता कोल्हे
कर्जत महामार्गावर दुचाकींचा अपघात

राहाता ः लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा,  काल 15 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यामध्ये जमा झाला आहे. तर काही बहिणींना पैसे जमा झाल्याचे मेसेज आला परंतु खात्यात पैसे जमा दिसत नाही. त्यामुळे बँकेत लाडक्या बहिणीची बँकेत गर्दी झाली. बँकेमध्ये बंद पडलेले खाते चालू करून घेणे, केवायसी करणे, यासाठी प्रचंड गर्दी दिसून येत आहे, खात्यातून पैसे काढताना प्रचंड धावपळ होत असून  बँक कर्मचार्‍यांची माञ दमछाक होत आहे. तुफान गर्दीमध्ये यायोजने सोबतच दैनंदिन व्यवहार करणारे, पेन्शनधारक तसेच इतर कामांसाठी देखील नागरिक बँकेत येत असल्यामुळे  बँक कर्मचार्‍यांची पुरती धांदल उडत आहे.

आपलं काम लवकर व्हावे व उद्या पुन्हा यावं लागू नये या आशेने महिला घाई करत असल्याचे चिञ आहे. बर्‍याच महिलांना बँकेतील फॉर्म भरता येत नसल्याने याचा ताण कर्मचार्यांवर आला. यामुळे या लाडक्या बहिणी योजनेसाठी जास्त काउंटर बँकेत सुरू करून बँक कर्मचारी महिलांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे पहावयास मिळते. यावेळी युनियन बँकेचे मॅनेजर प्रमोद राठोड यांनी सांगितले की मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे  पैसे बँकेत जमा झाले तर काही महिलांचे तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा झाले नाहीत त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा बँक खाते हे आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाही. बँक खाते हे आधार लिंक करण्यासाठी एक फॉर्म भरून द्यावा लागत असून फॉर्म भरून दिल्यानंतर लगेचच  बँक खाते हे आधारशि लिंक होऊन लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळतील. दिनांक 17 व 18 या दोन दिवसासाठी ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून बँक कर्मचारी जास्त तास काम करणार आहेत असे राठोड यांनी यावेळी सांगितले. तर स्टेट बँकेचे मॅनेजर  पूनम भुजबळ यांनी सांगितले की महाराष्ट्र शासन महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना राबवली. काल 15 ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा झाल्याचे संबंधित बहिणींना समजले तशी ते पैसे काढण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात बँकेमध्ये गर्दी केली. काही महिलांना पैसे मिळाले तर काहींना त्यांचे बँक खाते हे आधार  लिंक नसल्यामुळे पैसे काढण्यास अडचण निर्माण झाले.

गर्दीमुळे आम्ही महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून तीन टेबलवर फॉर्म भरून घेत असून त्यानंतर ते बँक खात्याशी जोडले जाणार आहेत. ज्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले आहे त्यांना पैसे मिळणारच तसेच आधार कार्ड लिंक नाही परंतु बँकेत पैसे जमा झाल्याचे दिसते त्यांना सुद्धा आधार लिंक झाल्यावर पैसे या योजनेचे मिळणार आहे त्यामुळे गर्दी न करता बँकेला सहकार्य करावे असे आवाहन बँक मॅनेजर भुजबळ यांनी केले. यापूर्वी या योजनेतील एक रुपया ट्रायल म्हणून महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला होता. त्यानंतर आता आणखी एका टप्प्यात राज्यभरातील महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनाही पैसे लवकर जमा होतील. लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असल्याचं नागरिकांमध्ये चर्चा आहे.

COMMENTS