Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला व अल्पसंख्यांक समाजावर होणारे अन्याय अत्याचार थांबवा-असिफोद्दीन खतीब

अंबाजोगाई - मणिपूर सह इतर राज्यात महिला व अल्पसंख्यांक समाजावर सातत्याने अन्याय अत्याचार होत असून हे थांबवावे तसेच अत्याचार करणार्‍या समाज कंटक

टाळेबंदीमुळे 1419 कर्मचार्‍यांना काढले ; जनरल मोटर्सचा निर्णय; कामगार संघटना आक्रमक
मांजरा प्रकल्प: अवकाळीमुळे पाच दलघमी पाण्याची बचत
भाजप नेत्याच्या मुलीची आत्महत्या

अंबाजोगाई – मणिपूर सह इतर राज्यात महिला व अल्पसंख्यांक समाजावर सातत्याने अन्याय अत्याचार होत असून हे थांबवावे तसेच अत्याचार करणार्‍या समाज कंटक प्रामुख्याने मनीपुर मध्ये महिलावर बलत्कार करणार्‍यास व नग्न धिंड काढणार्‍या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणी साठी बीड येथे काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष असिफोद्दीन खतिब यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
माणिपूर राज्यामध्ये गेल्या 3 महिन्यापासून अदिवासी समाजावर अन्या आत्याचार करून महिला भगीनीवर बलात्कार करून नग्न धिंड काढण्यात आली तसेच अनेक घरे जाळण्यात आली अनेक चर्च मध्ये जाळ पोळ करून उध्दवस्त करण्यात आले. संपूर्ण देशामध्ये धर्मातराच्या नावाखाली ख्रीस्ती धर्मगुरूना मारहाण करून निरवस्त्र करून रस्त्यावर आनले जाते व अनेक कुटुंबावर अन्याय आत्याच्यार करण्यात आला. दलित समाजातील लोकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आण्णा भाऊ साठे जंयतीची मिरवणूक का काढली म्हणून मारहाण करणे खून करणे आशा अनेक घटणा वांरवार घढत आहेत. लव्ह जिहादच्या नावाखाली व आतीक्रमणाच्या सदराखाली मस्जीद पाडण्यात आल्या,मुस्लीम समाजावर आन्याय आत्याचार केला जात आहे.तरी भारत देशामध्ये अल्पसंख्याक समाज बौध्द, ईसाई,मुस्लीम व अदिवासी समाजावर होणारा अन्याय आत्याचार थांबण्यात येवुन त्यांना संरक्षण देण्यात यावे व अन्याय अत्याचार करणार्‍या झुंडशाही, दंडेलशाही, हुकुमशाही करणार्‍या समाज कंटकावर कठोर शिक्षा करण्यात यावी आणि मनीपुर मध्ये महिलावर बलत्कार करणार्‍यास व नग्न धिंड काढणार्‍या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन बीड जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

COMMENTS