Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जेऊर बाजारतळावर दगडफेक

पोलिसांना धक्काबुक्की, दीडशे जणावर गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी ः यात्रेतील पाळण्यात बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन गटात तूफान दगडफेक झाली. या घटनेत अनेक जण किरकोळ जखमी झाले. एका ग

गावे समृद्ध झाली तरच देश महासत्ता होईल – भास्कर पेरे-पाटील
पहिल्या पत्नीस फसवून केले चक्क आणखी दोन विवाह..
जागर स्त्री शक्तीचा नवरात्रौत्सवाची उत्साहात सांगता

अहमदनगर/प्रतिनिधी ः यात्रेतील पाळण्यात बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन गटात तूफान दगडफेक झाली. या घटनेत अनेक जण किरकोळ जखमी झाले. एका गटाकडून पोलिसांनी धक्काबुक्की होऊन सरकारी कामात अडथळा निर्माण करण्यात आला. ही घटना नगर तालुक्यातील संभाजीनगर रोडवरील जेऊर बायजाबाई बाजारतळावर रविवारी रात्री साडे आठ वाजता घडली.
  या बाबतची माहिती अशी की, जेऊर बायजाबाई यात्रेनिमित्त एमआयडीसी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यात्रेच्या ठिकाणी पाळण्यामध्ये बसण्याच्या कारणावरून दोन गटात वाद होता. वादातून दोन्ही गटातील तरुण एकमेकांना शिवीगाळ करू लागले, त्यावेळी मुस्लिम मोहल्ल्यातील मुस्लिम मुलांनी दगडे उचलून इतर मुलांच्या पाठीमागे पळाले त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता ते पळुन गेले, त्यानंतर मुस्लिम मोहल्यातील मुलांनी सिना नदीमध्ये थांबलेल्या इतर मुलांवर दगडफेक केली असता सिना नदी मधील मुलांनीही त्यांचेवर दगडफेक करुन यात्रेतील लोकांना व एकमेकांना जखमी केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS