Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोरीस गेलेल्या बोअरच्या गाडीचा लागला तामिळनाडूत शोध

नेवासा पोलिसांच्या थेट कामगिरीचे जनतेने केले कौतुक

नेवासा फाटा/प्रतिनिधीः  नेवासा फाटा येथून चोरीस गेलेली बोअरवेलची गाडी नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या विशेष मार्गद

झेंडीगेट दक्षिणमुखी हनुमान मंदिरात 56 भोग अन्नकोट उत्साहात संपन्न
ब्राम्हणगांव ते रवंदा रस्त्यावरील बाभळीच्या काट्या काढण्याची ठाकरे गटाची मागणी
शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयाचे यश

नेवासा फाटा/प्रतिनिधीः  नेवासा फाटा येथून चोरीस गेलेली बोअरवेलची गाडी नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक एस.जी.ससाणे,मनोज मोंढे व पोलीस कॉन्सस्टेबल शाम गुंजाळ,पोलिस कॉन्स्टेबल राम वैद्य यांनी थेट तामिळनाडू येथे जावून सखोल तपास केला.तेथून चोरीस गेलेली बोअरची गाडी ताब्यात घेतली. पोलीसांच्या या  धडक कामगिरीमुळे तालुक्यातून पोलिसांच्या कामगिरीची प्रशंसा करत कौतुक केले जात आहे.
   याबाबत मिळालेले सविस्तर वृत्त असे की,नेवासा फाटा येथील विष्णू श्रीरंग निपुंगे यांनी नेवासा पोलिस ठाण्यात गाडी चोरीची फिर्याद दिली होती. फिर्यादीत म्हटले होते की, माझ्या मालकीची बोअरवेलची गाडी (क्रमांक के.ए 01 एम.एफ 1516) किंमत सुमारे 35 लाख रूपये असलेली गाडी चालक मुरुगेशन गोविंदन याने न सांगता पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखव करण्यात आलेला होता.
   गुन्हा दाखल होताच पो.नि.डोईफोडे यांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी नेवासा पोलिसांना तपासाकामी थेट तामिळनाडू राज्यात  रवाना केले. यामध्ये पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक एस.जी.ससाणे, उपनिरिक्षक मनोज मोंढे व पोलिस कॉन्सस्टेबल शाम गुंजाळ,पोलिस कॉन्स्टेबल राम वैद्य यांनी तामिळनाडू येथे जावून तपास करत गाडीचा शोध घेतला. बोअरवेलची गाडी तिथे सापडताच तात्काळ कारवाई करत ती जप्त  देखील केली. या धडक कामगिरीमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे

COMMENTS