Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात दीड कोटींचा विदेशी दारूचा साठा जप्त

पुणे : पुण्यात नवीन वर्षांचा फिवर सुरू होत असतांनाच राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. गोव्याहून पुण्यात नवीन वर्षांचा पार्श्‍वभू

सुविधांबरोबर मनुष्यबळही वाढवा प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मागणी
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये वसंतपंचमी  उत्स्फूर्त साजरी  
राज्यात तयार होणार लम्पी प्रतिबंधक लस

पुणे : पुण्यात नवीन वर्षांचा फिवर सुरू होत असतांनाच राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. गोव्याहून पुण्यात नवीन वर्षांचा पार्श्‍वभूमीवर अवैधरित्या विक्रीसाठी आलेला तब्बल 1 कोटी 75 लाख रुपयांचा विदेशी दारू साठा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तस्करांनी दारूचा वास येऊ नये म्हणून डांबराच्या गोळ्या कंटेनरमध्ये ठेवल्या होत्या. पोलिसांच्या पथकाने या प्रकरणी 7 जणांना अटक केली आहे. नवीन वर्षांच्या सेलिब्रेशनच्या एक दिवसाआधी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. अधिकार्‍यांनी तब्बल 2 हजारांहून अधिक दारूचे बॉक्स जप्त केले आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला मोठा मद्यसाठा अवैधरित्या पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती.

COMMENTS