मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापारयुद्ध छेडल्यानंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर कोसळला होता. गुंतवणूकदारांचे

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापारयुद्ध छेडल्यानंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर कोसळला होता. गुंतवणूकदारांचे कोट्यावधींचे नुकसान झाले होते. मात्र ट्रम्प यांनी व्यापारयुद्धाला 90 दिवसांची स्थगिती दिली होती, मात्र त्यात चीनला सूट दिलेली नाही. अशा परिस्थिती गुरूवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 1400 अंकानी वधारला असून, परदेशी गुंतवणूकदारांचा गुंतवणूक करण्याचा ओघ वाढला आहे.
सेन्सेक्स सुमारे 1400 अंकांनी वाढून 78,300 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीदेखील सुमारे 350 अंकांनी वधारला आहे. तो 23,800 च्या पुढे गेला आहे. सकाळी सेन्सेक्समध्ये सुमारे 350 अंकांची घसरण झाली. म्हणजेच, सेन्सेक्सने खालच्या पातळीपासून 1600 अंकांची वसुली केली आहे. निफ्टी सुमारे 140 अंकांनी घसरला. खालच्या पातळीपासून सुमारे 500 अंकांनी वसुली झाली आहे.
सोन्याचे दर 95 हजारांच्या पुढे
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वेगाने वाढतांना दिसून येत आहे. गुरूवारी सोन्याचे दर 95 हजारांच्या पुढे गेल्याचे दिसून आले. गुरूवारी 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 628 ने वाढून 95 हजार 207 झाली आहे. पूर्वी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 94 हजार 579 रुपये होती. चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव 936 रुपयांनी घसरून 95,639 रुपये प्रति किलो झाला.
COMMENTS