Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सचिन कोळपे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार

व्हॉट्स अ‍ॅप गु्रपच्या माध्यमातून जमवले दोनशेहून अधिक लग्न

Oplus_131072 कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील सुरेगावचे माजी सरपंच तथा पत्रकार सचिन मीरा नामदेव कोळपे यांना नुकताच दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वती

आगडगावचे भैरवनाथ मंदिरात आमटी भाकरीच्या महाप्रसादाला प्रारंभ
कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदावरून तुंबळ हाणामारी
विकेंड लॉकडाऊननंतर पेट्रोल-डिझेल स्वस्त की महागलं? | ‘सकाळच्या ताज्या बातम्या’ | LokNews24
Oplus_131072

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील सुरेगावचे माजी सरपंच तथा पत्रकार सचिन मीरा नामदेव कोळपे यांना नुकताच दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय मानाचा समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असून याबद्दल त्यांचा वर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सध्याचे युग हे मोबाईलचे युग असून या मोबाईलच्या काळात सर्वत्र सोशल मीडियाचा जोरदार वापर सुरू लहान थोराना सर्वांचा सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमाची आवड वाढली असून याचा वापर प्रत्येक जण चांगल्या गोष्टी साठी करत असून याचेच एक उदाहरण कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील माजी सरपंच सचिन मीरानामदेव कोळपे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील भीमराज महादू जुंधारे यांच्या सोबतीने धनगर समाजातील वधू-वरांसाठी 7 हजार सभासद संख्या असलेला सोशल मीडियाचा  व्हाट्सअप ग्रुप मागील वर्षी यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांच्या प्रेरणातून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सुरू केले असून आजपर्यंत त्यांनी या सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून समाजातील 200 पेक्षा अधिक लग्न जमवले आहे ही कौतुकास्पद बाब असून विशेष म्हणजे या कामासाठी व्हाट्सअप ग्रुपचे चालक सचिन कोळपे व जुंधारे हे कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. याच त्यांच्या समाजपयोगी कार्याची दखल घेऊन ध्यास परिवर्तनाचा विचार लोकशाहीचा या ब्रीदवाक्यानुसार संपादक बाळकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध राज्यभर कार्य करत असलेल्या दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीने सचिन कोळपे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर केला असल्याचे पत्र आयोजक तथा कार्यकारी संपादक रमेश खेमनर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

COMMENTS