सुपा ः पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथील रहिवासी तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष वसंत भानुदास रांधवण या

सुपा ः पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथील रहिवासी तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष वसंत भानुदास रांधवण यांची त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अहमदनगर (केडगाव देवी) येथील जय मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार 2024 करीता निवड करण्यात आली आहे. अशी माहिती जय मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेचे व यशवंत सेना अहमदनगर अहिल्या नगर परिवाराचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर यांनी दिली आहे.
जय मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवा निमित्ताने दर वर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. शनिवार दिनांक 22 जून 2023 रोजी सकाळी अकरा वाजता. अहमदनगर शहरातील लक्ष्मीनारायण सभागृह (पुणे एसटी स्टँड जवळ ) अहिल्यादेवी नगर अहमदनगर येथे सामाजिक चळवळीतील दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सन्मान पूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे जाडकर यांनी सांगितले या वर्षीचा जीवन गौरव पुरस्काराबद्दल रांधवण यांचे अक्षराज मिडियाचे मुख्य संपादक विनोद गोरे, सहसंपादिका प्राजक्ता चव्हाण-गोरे, पत्रकार राजकुमार इकडे व तालुक्यासह जिल्ह्यातील पत्रकारांनी, सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
COMMENTS