Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातुरात शनिवारी राज्य स्तरीय पर्यावरण परिषद

लातूर पतिनिधी - वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर आणि ट्री ट्रस्ट ऑफ इंडिया, उत्तराखंड यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवार, दि. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 1

मनपा जागा बळकावण्यासाठी सार्वजनिक शौचालय जमीनदोस्त
आईच झाली वैरीण ! पाच महिन्याच्या बाळाची गळा दाबून हत्या
जिल्हा परिषदेच्या शाळेचा कोसळला स्लॅब.

लातूर पतिनिधी – वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर आणि ट्री ट्रस्ट ऑफ इंडिया, उत्तराखंड यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवार, दि. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत राज्यस्तरीय पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात होणार असून या परिषदेत ‘पर्यावरण : काल, आज आणि उद्या’ याबद्दल विचारमंथन होणार आहे. परिषदेचे उद्घाटन पुण्याचे आयएस अधिकारी धनेश स्वामी यांच्या हस्ते होणार असून या वेळी अहमदपूरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
शनिवारी सकाळी 10 वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ गंगाधरआप्पा हामणे असणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, राजे प्रतिष्ठानचे प्रमुख श्रावणदादा जंगम, अ. भा. वी. लिंगायत महासंघाचे राष्ट्रीय सचिव वैजनाथ स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या वेळी ग्रीन मॅन ज्यांनी 10 लाखांहून अधिक झाडांचे संवर्धन केले आहे ते विजयपाल बघेल (उत्तराखंड) यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
दुपार सत्रात दुपारी 2 वाजता ‘पर्यावरण : काल, आज आणि उद्या’ या विषयावर नांदेड विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. अविनाश कदम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या वेळी निश्चल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. धर्मवीर भारती, सचिव अनिल पुरी, वन परिक्षेत्र अधिकारी निलेश बिराजदार, सुप्रसिद्ध उद्योजक भालचंद्रआप्पा मानकरी आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याच दिवशी रक्तदान शिबिराचेदेखील आयोजन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. या पर्यावरण परिषदेत सहभागी होणा-या प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दिवसभर परिषद असल्याने संयोजकांतर्फे मध्यान्ह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. परिषदेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असून जास्तीत जास्त प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य संयोजक तथा वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, ट्री ट्रस्ट ऑफ इंडियाचे मराठवाडा समन्वयक अमोलआप्पा स्वामी, मुख्य संयोजक तथा वसुंधरा प्रतिष्ठानचे कार्यकारिणी अध्यक्ष डॉ. अजित चिखलीकर, संयोजक तथा प्रतिष्ठानचे सचिव उमाकांत मुंडलिक, उपाध्यक्ष रामेश्वर बावळे, दुर्वेश बघेल, संयोजन समिती सदस्य प्रा. प्रेमसागर मुंदडा, प्रा. डॉ. श्रीकांत पंड्या, हुसेन शेख, शितल मगर, शिवाजी निरमनाळे, राहुल माशाळकर, उमेश ब्याकोडे, संजय माकुडे, प्रशांत मसलगे, अविनाश शिंदे, विजय कानडे, शिवकुमार एकलिंगे आदींनी केले आहे.

COMMENTS