राज्यातील निवडणुका पावसाळ्यात की दिवाळीआधी ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील निवडणुका पावसाळ्यात की दिवाळीआधी ?

सर्वोच्च न्यायालयाचा आज निर्णय अपेक्षित

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाने दिल्यानंतर निवडणूका कधी

शिवसेनेच्या 16 बंडखोरांना अपात्रतेची नोटीस | DAINIK LOKMNTHAN
’अम्फान’इतकेच घातक ठरणार ’यास’ चक्रीवादळ
नोरा फतेहीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक | LokNews24

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाने दिल्यानंतर निवडणूका कधी होणार असा सवाल विचारला जात आहे. निवडणुका जून-जुलैमध्ये होतील की ऑक्टोबरमध्ये याचा फैसला सर्वोच्च न्यायालयात आज मंगळवारी होणार असल्याने अवघ्या राज्याचे त्याकडे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने सादर केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मंगळवारी दुपारी 2 वाजता येणार आहे. या निवडणुकीसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश 4 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार आयोगाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई महापालिकेसह 14 महापालिकांची अंतिम प्रभाग रचना 18 मे रोजी जाहीर होणार आहे. ’आपण आदेश दिल्याप्रमाणे आम्ही निवडणूक प्रक्रिया सुरू केली ती 31 जुलैपर्यंत पूर्ण करू. त्यात प्रभाग रचना अंतिम करणे, आरक्षण निश्‍चित करणे, मतदार याद्या अंतिम करणे’ याचा समावेश असेल. 31 जुलैनंतरच प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे आयोगाला शक्य होईल पण ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये राज्यात पाऊस असेल त्यामुळे निवडणुका घेणे शक्य होणार नाही, अशी असमर्थता आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात व्यक्त केली आहे. एका अर्थाने निवडणुका ऑक्टोबरपूर्वी घेता येणे शक्य नाही, अशी असमर्थताच आयोगाने व्यक्त केली आहे. आयोगाच्या या अर्जावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात फैसला होईल.

COMMENTS