मुंबई : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवार 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे, त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अपेक्षित आहे. त्यामुळे हा
मुंबई : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवार 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे, त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अपेक्षित आहे. त्यामुळे हा शपथविधी शनिवारी 14 डिसेंबररोजी होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजधानी दिल्ली गाठली असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत मंत्रिमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा केली आहे. यासंदर्भात बोलतांना फडणवीस म्हणाले की, अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री कोण असतील ते ठरवतात आणि आमच्या पक्षाचे मंत्री मंडळ हे पार्लमेंटरी बोर्ड ठरवत असते. या संदर्भात आपण अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आहे. आमच्या पक्षाच्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असेल, या विषयी बावनकुळे आणि मी आमच्या नेत्यांची बोललो आहे. आमच्यात सविस्तर चर्चा झाली आहे. तशी एक यादी देखील आम्ही वरीष्ठांना दिली आहे. आता याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ आम्हाला कळवतील, असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चित ः मुख्यमंत्री फडणवीस
राजधानीत ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणत्याही प्रकारचा तिढा नाही. माध्यमांनी ज्या बातम्या चालवल्या त्या खर्या नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दिल्लीत अजित पवार हे त्यांच्या कामासाठी तर मी माझ्या कामासाठी आलो आहे. त्यामुळे येथे आमची भेट झाली नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. तर एकनाथ शिंदे यांचे सध्या दिल्लीत काम नसल्यामुळे ते आले नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. माचा मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा फॉर्म्युला ठरलेला आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार देखील होईल, असेही ते म्हणाले.
COMMENTS