Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाघे बाभुळगाव मध्यम प्रकल्पाच्या दुरुस्तीची प्रक्रिया त्वरीत सुरु करा-आ.नमिता मुंदडा

अंबाजोगाई - केज तालुक्यातील वाघे बाभुळगाव मध्यम प्रकल्पाच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेस मंजुरी मिळाली असून सदरील प्रकल्पाच्या दुरुस्तीची प्रक्रिय

विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ
केज पाठोपाठ अंबाजोगाई ‘एमआयडीसी’ च्याही जागेसाठी शोध सुरु
विभागीय महिला भजन स्पर्धेत बर्दापूरचचा संघ प्रथम

अंबाजोगाई – केज तालुक्यातील वाघे बाभुळगाव मध्यम प्रकल्पाच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेस मंजुरी मिळाली असून सदरील प्रकल्पाच्या दुरुस्तीची प्रक्रियाही त्वरीत सुरु करण्यात यावी अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी अधिक्षक अभियंता यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विभागाच्या अधिक्षक अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,  वाघेबाभुळगाव, ता. केज, जि. बीड. येथील मध्यम प्रकलपाच्या विशेष दुरुस्तीच्या कामाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. ज्याची किंमत 2.21 कोटी रुपये आहे. प्रशासकीय मान्यता नंतर या कामामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परंतु ॠडढ व नवीन दरसूची 2022-23 मधील झालेल्या बदलामुळे सदरील कामाची किंमत 2.21 कोटी वरून 2.62 कोटी एवढी झाली असून सदरचे अंदाजपत्रक सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रादेशिक कार्यालयास सादर करण्यात आले आहे. तसेच अंदाजपत्रकातील वाढ़ कोणत्याही वाढीव परिमाणा मध्ये झालेली नाही. प्रशासकीय मान्यते मध्ये खर्च करण्याची परवानगी देण्यात आल्यास सदरच्या कामाची निविदा काढून काम तात्काळ सुरु करणे शक्य होईल, करिता सदरच्या कामाची सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या किंमतीस निविदा काढण्याची व प्रशासकीय मान्यतेच्या किंमतीत खर्च करण्याची परवानगी देण्याबाबत कार्यकारी अभियंता, माजलगाव पाटबंधारे विभाग, परळी वै. यांनी आपल्याकडे मागणी केली आहे. तरी वाघेबाभुळगाव, ता. केज, जि. बीड. येथील मध्यम प्रकलपाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या किंमतीस निविदा काढण्याची व प्रशासकीय मान्यतेच्या किंमतीत खर्च करण्याची त्वरित परवानगी देण्यात यावी अशी मागणी आ नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.

COMMENTS