Homeताज्या बातम्याक्रीडा

क्रिकेटच्या नव्या हंगामाची सुरुवात विजयाने करा !

उद्यापासून म्हणजे १९ सप्टेंबर पासून भारतीय क्रिकेटचा नवा हंगाम सुरू होत आहे. या हंगामाची सुरुवात बांगलादेश सोबत आजपासून सुरू होणाऱ्या कसोटीपासून

दुबळ्या अफगाणिस्तानवर टिम इंडिया बरसली ; रागावलेल्या भारतीयांना दिवाळ भेट दिली !
सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्या
एकदिवसीय क्रिकेटचा नवा बादशहा कोण होणार ?

उद्यापासून म्हणजे १९ सप्टेंबर पासून भारतीय क्रिकेटचा नवा हंगाम सुरू होत आहे. या हंगामाची सुरुवात बांगलादेश सोबत आजपासून सुरू होणाऱ्या कसोटीपासून होत आहे. आजपासून  चेन्नई येथील चेपॉक मैदानावर भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिली कसोटी लढत रंगणार आहे. बांगलादेशचा संघ  भारतात दोन कसोटी आणि तीन टी २० सामने खेळणार आहे. या मालिकेकडे केवळ भारताचेच नाही तर क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. वास्तविक बांगलादेश याआधी ज्या ज्या वेळी  भारत दौऱ्यावर आला त्या त्या वेळी प्रसार माध्यमांनी आणि जागतिक क्रिकेटने त्याची म्हणावी दखल घेतली नाही त्याला कारणही तसेच होते कारण भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशात भारतच नेहमी वरचढ राहिला आहे. बांगलादेशने भारता विरुद्ध आजवर एकही कसोटी जिंकली नाही त्यामुळे बांगलादेश संघाला ना भारतीय प्रेक्षक जमेस धरत होते ना प्रसार माध्यमे मग यावेळेसच प्रसार माध्यमांचे आणि क्रिकेटप्रेमिंचे या दौऱ्याकडे लक्ष का ? 

तर त्याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला काही दिवस मागे जावे लागेल. काही दिवसांपूर्वी बांगलादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्याकडे देखील प्रसार माध्यमांनी दुर्लक्षच केले होते कारण सर्वांना वाटले होते की पाकिस्तान बांगलादेशला सहज नमवेल कारण पाकिस्तान संघ हा बांगलादेश पेक्षा बलवान संघ होता मात्र प्रत्यक्ष घडले उलटेच. पाकिस्तानने बांगलादेशची शिकार करण्याऐवजी बांगलादेशनेच पाकिस्तानची शिकार केली. बांगलादेशने पाकिस्तानला सलग दोन कसोटीत नमवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. बांगलादेश अशी ऐतिहासिक कामगिरी करेल अशी अपेक्षा कोणालाच नव्हती मात्र त्यांनी ती कामगिरी केली. पाकिस्तानला नमवणाऱ्या  बांगलादेश संघात जे खेळाडू होते तेच खेळाडू भारत दौऱ्यावर आले आहेत म्हणूनच या संघाने पाकिस्तानात जी कामगिरी केली त्याची पुनरावृत्ती ते भारतात करतील का ? हे पाहण्यासाठी संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष या मालिकेकडे लागले आहे. पाकिस्तानला पाकिस्तानात जाऊन पाणी पाजल्यावर बांगलादेश संघाचे मनोबल ही खूप वाढले आहे. बांगलादेशच्या कर्णधाराने थेट भारताला पराभूत करण्याची भाषा केली आहे अर्थात बांगलादेशने कितीही फुशारक्या मारल्या तरी बांगलादेश भारताला पराभूत करू शकत नाही कारण भारत म्हणजे पाकिस्तान नाही. भारताचा संघ हा क्रिकेट विश्वातील सर्वात बलवान संघ आहे. भारताची फलंदाजी जगातील सर्वात बलवान फलंदाजी आहे तर गोलंदाजी जगातील सर्वात घातक गोलंदाजी आहे. रोहित शर्मा,  यशस्वी जयस्वाल, शुभमन  गील, विराट कोहली, के एल राहुल, ऋषभ पंत ही फलंदाजांची लाईन अप पाहिली तरी धडकी भरते. जगातील सध्याचा  सर्वात घातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि  मोहंमद सिराज ही वेगवान जोडगोळी भारताला सुरुवातीलाच बळी मिळवून देतात तर आश्विन, जडेजा आणि अक्षर पटेल ही फिरकी तिकडी प्रतिस्पर्धी संघाला लोटांगण घालायला लावण्यास पुरेशी आहे शिवाय कुलदीप यादव हा देखील आपल्याकडे आहे त्यामुळे भारत ही मालिका २ – ० ने सहज जिंकेल आणि ती तशी जिंकायलाही हवी कारण ही मालिका भारताला विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( WTC ) फायनल मध्ये पोहचवण्यासाठी खूप महत्वाची आहे. भारताने जर बांगलादेशला क्लीन स्वीप दिला तर भारताचे पॉइंट वाढतील त्याचा भारताला मोठा फायदा होईल. शिवाय भारताला विजयाची लय सापडेल कारण या मालिके नंतर भारताला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या तगड्या संघाविरुद्ध खेळायचे आहे. जर भारताला विजयी लय सापडली तर त्याचा फायदा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होऊ शकतो. म्हणूनच भारतासाठी ही महत्वाची मालिका आहे. भारतीय खेळाडूंना देखील हे चांगले माहीत आहे म्हणूनच भारतीय संघातील खेळाडू ही मालिका २ – ० ने जिंकण्यासाठी जीवाचे रान करतील यात शंका नाही. क्रिकेटच्या नव्या हंगामाची सुरुवात विजयाने करण्यासाठी भारतीय संघाला मनापासून शुभेच्छा!

COMMENTS