Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश सुविधा केंद्र सुरु

कोपरगाव ः कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेला 29 मे 2024 पासू

प्रज्वल ढाकणे यांना सामाजिक जाणिवेचा पुरस्काराने सन्मानित
रस्त्यावर भांडणे करू नका म्हटल्याच्या रागातून विनयभंग
ममदापूरातून गोमांसह दोन आरोपींना अटक

कोपरगाव ः कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेला 29 मे 2024 पासून सुरुवात होणार असून तंत्रशिक्षण संचालनालय मार्फत गौतम पॉलिटेक्निक  इन्स्टिट्यूट, गौतमनगर (एफसी कोड-5417) महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.
गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुट मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेतांना प्रवेश प्रक्रियेबाबत प्रशिक्षित व अनुभवी प्राध्यापक असून येथे उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा यामध्ये सुसज्ज ईमारत, अतिजलद इंटरनेट सुविधा उपलब्ध असून सर्व सोयींनीयुक्त अशी कार्यशाळा, सर्व प्रकारची साधन सामुग्री या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई, यांच्याकडून दहावीनंतरच्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. 29 मे पासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया करावी लागणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचणी येऊ नये यासाठी गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट गौतमनगर (कोळपेवाडी) येथे प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र नियुक्त केले आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन प्रवेश प्रक्रियेतील येणार्‍या अडचणी व शंका या सुविधा केंद्रास भेट देऊन दूर कराव्यात. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणालयाच्या संकेत स्थळावर प्रवेश घेवू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. प्रवेशासाठी आवश्यक असणा-या आपल्या कागद पत्रांची पडताळणी भरलेल्या माहितीत सुधार करणे आणि ऑनलाईन फॉर्म निश्‍चिती करणे गरजेचे आहे.या केंद्रातून संस्था व शाखा निवड, विकल्प, अर्ज भरणे प्रवेशाच्या फे-या व प्रवेश घेवू इच्छिणा-या विद्यार्थ्याला हवे असलेले शैक्षणिक संकुल व हवी असलेली शाखा मिळावी यासाठी नवीन नियमावलीनुसार विकल्प अर्जातील विविध पर्यायावरील पसंती आदी बाबींची विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती मिळणार असल्याचे प्राचार्य सुभाष भारती यांनी सांगितले आहे.

COMMENTS