Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहरातील जुनी तहसीलच्या जागेवर आरोग्य केंद्र सुरू करा-पठाण अमर जान

बीड प्रतिनिधी - शहरातील बलभीम चौक येथील जुनी तहसील जागेवर उप आरोग्य केंद्रात अथवा प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी जिल्हा आरोग्

तालुक्यातील माणिकदौंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी नियमित डॉक्टर उपलब्ध असावे ; काँग्रेसची मागणी
…तर, नवनीत राणांनी महिला आयोगाकडे तक्रार करावी : रुपवते
महाराष्ट्राच्या वाट्याला चार मंत्रिपदे

बीड प्रतिनिधी – शहरातील बलभीम चौक येथील जुनी तहसील जागेवर उप आरोग्य केंद्रात अथवा प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद बीड यांच्याकडे एका निवेदनातून करण्यात आली आहे.
शहरातील बलभीम चौक येथे निजाम कालीन जुनी तहसिलची मोकळी जागा असून सदरील जगा नगर परीषद कार्यालय बीडच्या अधिकाराखाली असून सदरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेचा कसल्याही शासकीय किंवा निमशासकीय कामासाठी वापर झालेला नाही.बीड शहरातील जुना बीड मधील हत्तीखाना,हफीज गल्ली, जुना बाजार,लोहार गल्ली,भंडार गल्ली,चून गल्ली, थिगळे गल्ली,काळे गल्ली,टिळक रोड,पिंगळे गल्ली, बुंदेलपुरा,कारंजा, धांडे गल्ली, तेरवी लाईन,अजीजपूरा,खासबाग,माळी गल्ली,खंदक,किल्ला मैदान व कागदी वेस इ. भागांच्या मध्यवर्ती असून या जुन्या बीड मधील भागात सामान्य कष्टकरी कामगारांची संख्या जास्त असून या भागाच्या नागरीकांसाठी उप आरोग्य केंद्र अथवा प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झालातर त्याच्या आरोग्यासाठी मोठा दिलासा भेटेल व त्यांच्या वेळीची व पैसाची बचत होईल व त्याचप्रमाणे या भागात रोजगारही वाढेल व विकासाला चालना मिळेल.तरी बीड शहरातील जुन्या बीड मधील बलभीम चौक येथील जुनी तहसिलच्या जागेवर उप आरोग्य केंद्र अथवा प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी पठाण अमर जान यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद बीड यांच्याकडे 24 जुलै रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहेत.

COMMENTS