Homeताज्या बातम्याक्रीडा

स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड अडकणार विवाहबंधनात

मुंबई प्रतिनिधी - चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर पडला आहे. निवड समितीने त्याचा स

पाणी पुरवठ्याबाबत प्रशासनाकडून कराडकरांसह लोकप्रतिनिधींची दिशाभूल
पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची पदकांची लयलूट… जिंकली चार पदके
क्रिकेटर कैया अरुआचे वयाच्या 33 व्या वर्षी निधन

मुंबई प्रतिनिधी – चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर पडला आहे. निवड समितीने त्याचा स्टँडबाय संघात समावेश केला होता. मात्र, तो आता बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आयपीएल2023 मध्ये भरपूर धावा करणारा राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वाल स्टँडबाय संघ म्हणून लंडनला जाणार आहे. मात्र, बीसीसीआयने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. 26 वर्षीय ऋतुराज आयपीएलनंतर 3 जूनला लग्न करणार आहे. त्यामुळे त्याला अंतिम फेरी गाठता येणार नाही. भारतीय संघासोबत लंडनला जाणार्‍या तीन राखीव खेळाडूंमध्ये ऋतुराजचा समावेश होता. आता ऋतुराजच्या जागी यशस्वी लंडनला जाणार आहे. ऋतुराज जिच्याशी  लग्न करणार आहे , तिचे नाव उत्कर्षा आहे. दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. ऋतुराज उत्कर्षासोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे

COMMENTS