Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी

समाजाच्या वतीने राहता पोलिस स्टेशनला निवदेन देवून मागणी

राहाता ः धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशी मागणी समस्त धनगर समाजाच्या वतीने राहता पोलीस स्

धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण
सोलापुरात आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक
धनगर समाजाच्या उपोषणाची सरकारकडून दखल

राहाता ः धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशी मागणी समस्त धनगर समाजाच्या वतीने राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांना सादर मागणीचे निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. र्कीें धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पंढरपूर येथे सोमवार दि 09 सप्टेंबर 2024 पासून काही उच्चशिक्षत तरुण, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आमरण उपोषणांस बसलेले आहेत. आज उपोषणाचा बारावा (12वा) दिवस असुन उपोषणकर्त्यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. तरीही सरकारकडून या उपोषणाची अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. याचा महाराष्ट्रातील धनगर बांधव तीव्र निषेध करीत आहेत.
सदर निवेदनद्वारे सकल धनगर समाज शिर्डी शहर व राहाता तालुका धनगर समाज बांधव प्रशासनाच्या माध्यमातून निवेदन च्या माध्यमातून, या प्रश्‍नाची दखल घेवुन तातडीने उचित ती कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा धनगर समाजाचा उद्रेक होऊन राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन व प्रशासन जबाबदार राहील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन देण्यासाठी बाळासाहेब गिधाड, संजय भाकरे, बाबासाहेब मुंडलिक, बाबासाहेब गिधाड, शिवाजी नजन, मारुती गिधाड, नानासाहेब काटकर, रमेश बनकर संपत जाधव रवींद्र नजन, वैभव सोनवणे, विजय गिधाड रंगनाथ गिधाड, वसंत गायकवाड, अंकुश भडांगे, पंढरीनाथ गिधाड आदीसह मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

COMMENTS