Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी कर्मचार्‍यांचा आजपासून संपाचा इशारा

मुंबई ः ऐन गणेशोत्सव काळामध्ये एसटी कर्मचार्‍यांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे ऐन सण-उत्सवाच्या काळात हाल होण्याची शक्यता आहे

चक्क! गुन्हेगारच रक्ताच्या थारोळ्यात l LokNews24
आगटीतल्या हुरड्याची अन हावळ्याची चव काही न्यारीच : फास्टफूडमध्ये अडकलेली पिढी यापासून दूरच
बबनराव बाळाजी कुटे यांचे निधन

मुंबई ः ऐन गणेशोत्सव काळामध्ये एसटी कर्मचार्‍यांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे ऐन सण-उत्सवाच्या काळात हाल होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचारी संघटनेने आज मंगळवारपासून राज्यभर बेमुदत आंदोलन पुकारले आहे. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशारा देत एसटी कर्मचारी संघटनेने बेमुदत संप पुकारला आहे. ऐन गणेशोत्सव काळात लालपरीला ब्रेक लागणार असल्याने सामान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एस टी कामगारांच्या आर्थिक मुद्यांची सोडवणूक तातडीने व्हावी यासाठी सोमवारी राज्यभर उग्र निदर्शने झाली तर मंगळवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. सोमवारी दुपारी 1ः30 वाजता मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्या वतीने निदर्शने व द्वारसभा आयोजीत केली असून यावेळी सरकारला अंतिम इशारा देण्यात आला आहे. अन्यथा तीन सप्टेंबरपासून राज्यभर बेमुदत संप पुकारला आहे.राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांप्रमाणे एस टी कर्मचार्‍यांना वेतन मिळायला पाहिजे, प्रलंबित महागाई भत्ता व फरक, वाढीव घरभाडे भत्ता व फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849/- कोटींमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या 5000/-, 4000/-, 2500 ऐवजी सरसकट पाच हजार मिळावेत, यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी बेमुदत संप पुकारला आहे. एसटी कर्मचारी संघटनांकडून खाजगीकरण बंद करा, सुधारीत जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करा, इनडोअर व आऊटडोअर मेडीकल कॅशलेस योजना लागू करा, विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या या मागण्या करण्यात आल्या आहेत.

COMMENTS