Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीनिवास पाटील यांचा निवडणूक लढविण्यास नकार

सातारा ः सातार्‍याचे विद्यमान खासदार, श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात राष्

पत्नीसह 2 मुलींची गोळ्या घालून हत्या
राजीनामासत्र आणि सरकारचा दबाव
अवैध खनिज कारवाईत 22 लाख रूपयांचा दंड

सातारा ः सातार्‍याचे विद्यमान खासदार, श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोणाला संधी देण्यात येते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी सातारा मतदारसंघात जाऊन पदाधिकार्‍यांची बैठक घेत सविस्तर चर्चा केली. यावेळी उमेदवारी संदर्भात पदाधिकार्‍यांच्या, कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. यानंतर बोलताना शरद पवार यांनी सातार्‍यातील उमेदवार कोण असेल? याबाबतचा निर्णय दोन दिवसांमध्ये घेण्यात येईल, असे सांगितले.

COMMENTS