Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 ’बाप्पाला पत्र ’ स्पर्धेत श्रीज्या मोहन रासकर सर्वप्रथम

कोपरगाव प्रतिनिधी ः शेमारू मराठी बाणा  वाहिनीने आयोजित केलेला ’जयघोष  गणरायाचा’ उपक्रमात ’ बाप्पाला पत्र ’ या स्पर्धेत विद्या प्रबोधिनी प्राथमिक

राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी
१०० सायकलस्वार करणार पाच राज्ये व बांगलादेशातून ३००० किलोमीटरचा प्रवास
दूध उत्पादकांनी नवे तंत्रज्ञान अवगत करावे

कोपरगाव प्रतिनिधी ः शेमारू मराठी बाणा  वाहिनीने आयोजित केलेला ’जयघोष  गणरायाचा’ उपक्रमात ’ बाप्पाला पत्र ’ या स्पर्धेत विद्या प्रबोधिनी प्राथमिक शाळा कोपरगाव ता.कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथिल इयत्ता सहावीची विद्यार्थिनी श्रीज्या मोहन रासकर हिने सर्वप्रथम क्रमांक मिळविला आहे.
 या स्पर्धेत द्वितीय क्रमांक अद्वय भरत शिलेदार व तृतीय क्रमांक प्रथमेश किशोर जाधव यांनी मिळविला मोठ्या गटात प्रथम क्रमांक प्रबुद्ध रावसाहेब भातकुडव, द्वितीय क्रमांक समृद्धी सूर्याजी सूर्यवंशी, तृतीय क्रमांक दर्शन अमोल गुरव या विद्यार्थ्यांनी मिळविला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे वर्ग शिक्षिका स्वप्ना ढेपले, मराठी विषय शिक्षिका श्रद्धा शिंदे,मुख्याध्यापक दत्तात्रय गवळी यांचे विद्या प्रबोधिनी शाळेचे अध्यक्ष हेमंतराव माधवराव पटवर्धन, सचिव दिनेश आसाराम दारुणकर, सदस्य दिपाली हेमंत पटवर्धन आदी मान्यवरांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.

COMMENTS