Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा-मांडवगण रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ट

एक महिन्यात रस्ता खचण्याचा विक्रम

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीलगत नव्याने दुरुस्त करण्यात आलेला श्रीगोंदा-मांडवगण या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ठ पद्धतीने सुर

भाजप राज्यपालांची अजून किती अप्रतिष्ठा करणार..?;पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल
मद्यपी वाहन चालका विरूद्ध गुन्हा दाखल
पाथरवट समाज महिला आघाडीच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. स्वाती मैले

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीलगत नव्याने दुरुस्त करण्यात आलेला श्रीगोंदा-मांडवगण या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ठ पद्धतीने सुरू असून कामासाठी निकृष्ठ दर्जाचा मुरूम तसेच कालबाहा मशिनरी वापरण्यात येत असल्याचे वारंवार सार्वजनिक बांधकाम प्रशासनाला कळविण्यात आले होते. तसेच सदर काम करणार्‍या ठेकेदारास कामाचा योग्य अनुभव नसल्याने सक्षम अधिकार्‍यांच्या उपस्थितीतच काम सुरू ठेवण्याचे सांगण्यात आले होते. परंतु बांधकाम प्रशासन निवडणुकीच्या कामत व्यस्त असताना घाईघाईने काम पूर्ण करण्यात आले.
परिणामी एक महीना पूर्ण होतो न होतो तोच दुरुस्ती केलेला रस्ता पुर्णपणे खचला असून अनेक ठिकाणी फुटून खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. तात्काळ वरीष्ठ पातळीवर चौकशी अहवाल तयार करुन संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत समाविष्ट करावे तसेच इतर कामाची देखील पाहणी करुन स्थगीती देण्यात यावी. सदर कामाचे योग्य पध्दतीने पुन्हा खोदकाम करुन दर्जेदार मटेरियल व योग्य मशिनरी वापरून सक्षम अधिकार्‍यांच्या उपस्थितीतच काम पुर्ण करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेड कडून करण्यात आली आहे.

कामासाठी खर्च करण्यात येणारा पैसा जनतेचा असून अशा बोगस कामांसाठी मुळीच खर्च करू दिला जाणार नाही.
शामभाऊ जरे, तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड

COMMENTS