श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2023-2024 निकाल जाहीर झाले असून श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय श्रीगोंदा या विद्यालयान
श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2023-2024 निकाल जाहीर झाले असून श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय श्रीगोंदा या विद्यालयाने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी परीक्षेत गुणवत्ता कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. परीक्षेला एकूण 8 विद्यार्थी पात्र झाले आहेत.
पात्र विद्यार्थ्यी मध्ये कु. इथापे गार्गी हरिभाऊ 222 गुण, कु. गारुडकर पूर्वी संजय 200 गुण, कु. ढवळे तनिष्का कैलास 158 गुण, कु. साळुंके आरोही सचिन 140 गुुण, सुपेकर वीर शरद 138 गुुण, शेख रेहान रियाज 134 गुुण, कु. गारुडकर ईश्वरी राजेंद्र 130 गुण, सुपेकर आदित्य राहुल 124 गुण मिळवून यश संपादन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांसह पालकांचे सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सह. साखर कारखान्याचे चेअरमन व ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय मा.श्री.राजेंद्र (दादा) नागवडे, ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मा.सौ अनुराधाताई राजेंद्र नागवडे,ज्ञानदीप संस्थेचे निरीक्षक बी.के.लगड आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व सेवकवृद आणि सर्व सन्माननीय ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
COMMENTS