नाशिक प्रतिनिधी :- नाशिक मर्चेंटस् को ऑप बँकेच्या अटीतटीच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नवीन द्विस्ट आला आहे. सहकार पॅनलच्या सर्व उ

नाशिक प्रतिनिधी :- नाशिक मर्चेंटस् को ऑप बँकेच्या अटीतटीच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नवीन द्विस्ट आला आहे. सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने या अटीतटीच्या निवडणुकीतील हवाच निघून गेली असून २१ जागांसाठी होणाऱ्या या पंचवार्षिक निवडणुकीत अखेरच्या क्षणी २८ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिल्याने निवडणूक मात्र अटळ राहिली.
सत्ताधारी प्रगती पॅनलच्या विरोधात सहकार पॅनल तयार होत असल्याने निवडणूक रंगतदार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली – जात होती. मात्र, या निवडणुकीतून बिनशर्त सामूहिक निर्णय घेऊन माघार घेतली.
सहकार पॅनलचे अॅड. अक्षय कलंत्री वगळता इतर सर्व उमेदवारांनी सकाळी माघार घेतली.
सर्वसामान्य, शेतकरी, व्यापारी वर्गात वेगळा संदेश जाऊ नये या हेतूने सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी काल बिनशर्त माघार घेतली.
सत्ताधारी प्रगती पॅनलच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करावी, या मागणीसाठी उच्च न्यायालयात गेलेले असल्याने सदरच्या केसवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून भवर यांनी माघार घेतलेली नाही.
दरम्यान सत्ताधारी प्रगती पॅनलची अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर शर्मा मंगल कार्यालय येथे बैठक घेऊन घोषणा करण्यात आली. त्यामध्ये माजी आमदार वसंत गिते, सोहनलाल भंडारी, हेमंत धात्रक, विजय साने, रंजन ठाकरे, अविनाश गोठी, नरेंद्र पवार, ललित मोदी, अशोक सोनजे, गणेश गिते, महेंद्र बुरड, सुभाष नहार, प्रफुल्ल संचेती, हरीश लोढा, आकाश छाजेड, भानुदास चौधरी, प्रकाश
दायमा, देवेंद्र पटेल, सपना बागमार, शितल भट्टड, प्रशांत दिवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे महिला राखीव गटातून सपना बागमार व शितल भट्टड यांची बिनविरोध निवड झाली असून केवळ औपचारिक घोषणा होणे शिल्लक आहे. शर्मा मंगल कार्यालय येथे झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी विविध पक्षातील पदाधिकारी, मान्यवर, माजी मंत्री, सदस्य त्याचप्रमाणे बँकेचे सभासद देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडणुकीत प्रगती पॅनलच्या विरोधात दुसरे पॅनल जरी उभे करता आले नसले संदीप भवर, अॅड. सुधाकर जाधव, महेंद्र गांगुर्डे, संजय नेरकर, विजय बोरा, कपिल शर्मा आणि विलास जाधव हे सात उमेदवार अखेरपर्यंत रिंगणात राहिलेले आहेत.
COMMENTS