Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सदगुरुंच्या नामस्मरणात प्रचंड सामर्थ्य श्रीसंत सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन

नामसंकीर्तन मंडपात शांतिगिरीजी महाराजांनी केले नाचून गाऊन भजन ; भाविकांनीही धरला ठेका..

नाशिक प्रतिनिधी -  'न करिता सदगुरूंचे भजन, नोव्हे भव वृक्षाचे छेदन, जरी कोटी कोटी साधन, आणे आण केलीया'  या एकनाथी भागवतातील  एकच ओवीतून सदगुरुंच्

खैरेंचा खुंटा उपटू शकतो
सामाजिक न्याय विभागात ‘महसूल’ ची घुसखोरी
थकलेल्या फीसाठी वकिलाने अशिलाचेच केले अपहरण

नाशिक प्रतिनिधी –  ‘न करिता सदगुरूंचे भजन, नोव्हे भव वृक्षाचे छेदन, जरी कोटी कोटी साधन, आणे आण केलीया’  या एकनाथी भागवतातील  एकच ओवीतून सदगुरुंच्या नामाला किती मोठे महत्व आहे हे लक्षात येईल.म्हणूनच सदगुरूंच्या नामाचा आणि सदगुरूंच्या कामाचा कधीही विसर पडू देऊ नका. सदगुरुंच्या नामात प्रचंड सामर्थ्य आहे ते ओळखा आणि ओम जनार्दनाय  नमः  या महामंत्राचा सतत जप करा आणि आपले जीवन सार्थक करा.

असे प्रतिपादन निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्म पीठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित श्रीसंत सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केले.

            निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या ३४ व्या पुण्यस्मरणार्थ  नाशिक येथील तपोवनात जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्या दरम्यान महाजपानुष्ठान,१०८ कुंडात्मक महायज्ञ,अखंड नंदादीप, नामसंकीर्तन,हस्त लिखित नामजप,भागवत पारायण,श्रीराम कथा आदी विविध धार्मिक उपक्रम मोठया उत्साहात सुरू आहे.यावेळी अनंत विभूषित श्रीसंत सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी  नामसंकीर्तन मंडपात येऊन भविकांसमवेत टाळ-मृदुंगाच्या गजरात नाचून गाऊन आनंदोत्सव साजरा केला. आणि नाम जपाचे महत्व व शक्ती उपस्थितांना सांगितली.यावेळी बाबाजी म्हणाले की, नाम आहे ज्याच्या पाशी जिथे बसेल तिथे काशी, नामजप साधन ते सोपे, जळतील पापे जन्मांतराची,एकदा भगवंताचे व सदगुरूंचे नाम जपल्यास पुण्याची गणना होऊ शकत नाही.कारण हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असे संत वचन आहे. नाम जपाच्या प्रभावाने पापाचे पर्वत भस्म होतात.इतकी शक्ती नाम जपाची आहे.कलियुग केवल नाम आधारा असे सांगतानाच

भारतीय संस्कृतीत गुरू-शिष्याचे अतूट नाते आहे.जीवनातील अंधकार दूर करायचा असेल तर सदगुरूंना शरण येऊन त्यांच्या आज्ञेचे पालन करावे.सदगुरू नामात मोठे सामर्थ्य आहे .ज्यांच्या मुखात सदगुरूंचे नामस्मरण असेल त्यांना प्रत्यक्ष काळही काही करू शकणार नाही.मात्र आवडीने,भावाने नाम घ्यावे. जो सदगुरूंची निष्काम भावनेने सेवा करेल त्याच्या पायी तर मोक्ष देखील लोटांगण घेईल. मात्र भागवतातील या ओवीचा अर्थ समजेल त्याच्या साठी आहे.

प्रत्येकामध्ये भगवंताचा वास आहे.त्यामुळे सर्वांशी प्रेमाने,नम्रतेने,आदराने वागा, सतत कामात आणि नामस्मरणात रहा,व्यसनापासून दूर रहा , सतत ओम जनार्दनाय नमः हा सदगुरु मंत्र जपण्याचा ध्यास घ्या. बाबाजींनी सुरू केलेल्या जपानुष्ठान,गुरुकुल श्रमदान,गोसेवा, आणि ऋषी व कृषी सेवा आदी परंपरा समाजासाठी वरदानकारी आहेत.भाविकांनी भक्तीत सातत्य ठेवावे योग,प्राणायाम करा असे सांगतानाच चहा आरोग्यास नुकसान कारक असल्याने आपल्या आरोग्यासाठी गायीचे दूध प्या,घरोघरी गोमातेचे पालन करा.कुठलेही व्यसन करू नका.सदगुरू भक्ती केल्या शिवाय परमार्थ प्राप्त होत नाही.म्हणून सदगुरूंच्या नामस्मरणात आणि त्यांच्या कार्यात रहा

असेही अनंत विभूषित श्रीसंत सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी सांगितले.दरम्यान अनंत विभूषित स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी नामसंकीर्तन विभागातील मंडपात येऊन ओम जनार्दनाय नमः नामाचा जप करत नाचून- गाऊन आनंदोत्सव साजरा केल्याने उपस्थित भाविकांचा उत्साह वाढला. यावेळी बाबाजींच्या प्रचंड जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

COMMENTS