नाशिक - जिल्हा मध्यवर्ती कारागृह व नाशिक इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कारागृहातील बंदी
नाशिक – जिल्हा मध्यवर्ती कारागृह व नाशिक इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कारागृहातील बंदीवानांसाठी परिवर्तन- Prison to Pride अंतर्गत 15 जुलै ते 14 ऑगस्ट 2023 या कालावधीत क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घघाटन झाल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अरूणा मुगूटराव यांनी दिली आहे.
या क्रीडा प्रशिक्षण शिबिरामुळे बंदीवानांच्या शारिरीक, मानसिक व बौद्धीक क्षमतेत वाढ होऊन सांघिक भावना वाढीस लागेल. तसेच बंदीवानांनी या क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून कारागृहाचे नाव जागतिकस्तरावर उंचवावे. तसेच या क्रिडा प्रशिक्षण शिबिरात व्हॉलीबॉल, बुद्धीबळ, कॅरम या खेळांचा समावेश असणार आहे, असेही श्रीमती मुगूटराव यांनी सांगितले.
या क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन कॅरम व बुद्धीबळ खेळून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास कारागृह उप अधीक्षक एस. व्ही. चिकणे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी ए.व्ही. मलवाड, आर. यु. चौधरी, पी.डी. पाईकराव, डी. बी. बेडवाल, एस. किशोर, शिक्षक हेमंत पोतदार, बालाजी म्हात्रे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन चे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर जी. एस. पी. सिंग, चिफ जनरल मॅनेजर के. गुरूराज, आर. के शर्मा, सिनिअर मॅनेजर हेमलता नागदेव यांच्यासह बंदीवान उपस्थित होते.
COMMENTS