नाशिक - भारतीय संस्कृती जोपसून मातृ पितृ दिनानिमित्य पाद्यपुजन व वसंतपंचमी उत्साहात साजरा करण्यात आली मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस

नाशिक – भारतीय संस्कृती जोपसून मातृ पितृ दिनानिमित्य पाद्यपुजन व वसंतपंचमी उत्साहात साजरा करण्यात आली मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल जाधव संकुल येथे मातृ-पितृदीन उत्साहात साजरी करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक माननीय श्री प्रकाश सुखदेव कोल्हे दादा संस्थेच्या सचिव माननीय सौ ज्योती कोल्हे मॅडम शाळेच्या समन्वयीका सौ सुरेखा आवारे वारे मॅडम. मुख्याध्यापिका सौ. वसुंधरा चटर्जी मॅडम आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी दादांनी मार्गदर्शन करते वेळी सांगितले की प्रत्येक आई वडिलांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस म्हणजेच मातृदिन. तसेच भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता – सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे.याप्रसंगी सर्व मानव सेवक उपस्थित होते
COMMENTS