रंगलहरी दशकपुर्ती चित्र प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रंगलहरी दशकपुर्ती चित्र प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीरामपूर : चित्रकार रवि भागवत व भरतकुमार उदावंत यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या रंगलहरी कला दालनाच्या दशकपुर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या

कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी देवगड नगरी सज्ज
छमछमला उस्थळ दुमाला गावातून एकमुखी विरोध !
शेतकर्‍यांसाठी तक्रार निवारण केंद्राची स्थापना  

श्रीरामपूर : चित्रकार रवि भागवत व भरतकुमार उदावंत यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या रंगलहरी कला दालनाच्या दशकपुर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनास शहरातील कला रसिकांचा उतस्फूर्त प्रतिसाद लाभला. येथील रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या व रयत शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा मीनाताई जगधने, चित्रकार भागवत यांच्या मातोश्री इंदूमती, वडील काशिनाथ भागवत, चित्रकार उदावंत, दि. श्रीरामपूर प्रेस क्लबचे सचिव पत्रकार बाळासाहेब आगे, आरबीएनबी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, चंद्ररूप डाकले महाविद्यालयाचे प्राचार्य निंबाळकर, उद्योजक किशोर निर्मळ यांच्या हस्ते दिपप्रज्वलन होऊन प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

            चित्रकार  उदावंत व भागवत यांनी २०१२ मध्ये रंगलहरी आर्ट ॲकॅडमीची स्थापना करून रंगलहरी कलादालनाची निर्मिती केली. या दशकपुर्तीनिमित्ताने कला रसिकांची ऊतराई होण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनात चित्रकार उदावंत व भागवत यांची साकारलेली व्यक्तीचित्र, निसर्गचित्र, कार्टून्स, प्राण्यांची चित्रे, धार्मिक चित्रे, ऐतिहासिक चित्रांसोबतच रंगलहरीच्या निवडक विद्यार्थ्यांची चित्रेही पहावयास मिळाली. प्रदर्शनास रसिकांचा  प्रचंड प्रतिसाद लाभला. सकाळपासूनच चित्रांचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षकांचा ओघ सुरू होता. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीही मोठा प्रतिसाद लाभला. प्रदर्शन यापुढेही सुरूच राहणार असून कला रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भागवत यांनी केले आहे. यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, अंजूम शेख, पंचायत समिती सभापती वंदना मुरकुटे, माजी नगरसेविका भारती कांबळे, समिना शेख, माजी नगरसेवक रवी पाटील, आशिष धनवटे, पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके, तहसीलदार प्रशांत पाटील, साई संस्थानचे सदस्य सचिन गुजर, अनुराधा आदिक यांच्या मातोश्री पुष्पलता आदिक, श्रीरामपूरचे तलाठी राजेश घोरपडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, डॉ. कुमार चोथाणी, डॉ. रविंद्र जगधने, डॉ. वसंत जमधडे, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. दिलीप पडघन, डॉ. सिंधू पघडन, डॉ. रविंद्र कवडे, डॉ. उज्ज्वला कवडे, डॉ. ऋतुजा जगधने, प्राची चोथाणी, राजू पठाडे, टॅक्सी असोसिएशन्सचे सुनील मुथ्था, माजी सभापती सुनीता गायकवाड, जयश्री जगताप, आरोग्यमित्र सुभाष गायकवाड, राजेंद्र बनकर, दि. श्रीरामपूर प्रेस क्लबचे उपाध्यक्ष विष्णू वाघ, खजिनदार प्रकाश कुलथे, नवनाथ कुताळ, सुनील नवले, अनिल पांडे, अशोक गाडेकर, उषा गाडेकर, राजेंद्र बोरसे, करण नवले, पुनम नवले, शिवाजी पवार, प्रदिप आहेर, नितीन शेळके, संतोष बनकर, गौरव साळुंके, योगेश वांडेकर, धनंजय कानगुडे, मयूर पांडे, जयेश सावंत, मयूर सोनार, आदिनाथ जोशी, ॲड. प्रसन्ना बिंगी, सिद्धीविनायक पतसंस्थेचे व्यवस्थापक अमोल जोशी आदींनी प्रदर्शनाचा आनंद लुटला.

            पत्रकार विकास अंत्रे, महेश माळवे, अमोल निकम आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी पाटबंधारे विभागाचे सेवा निवृत्त लिपीक अशोकराज आहेर, सत्यजित उदावंत, राजेंद्र उदावंत, जीवन सुरुडे, विजय फुलारे, प्रशांत जोर्वेकर, अभय जोर्वेकर, गणेश भागवत, धनंजय अभंग, पूर्वा पवार, माधवी जाधव, प्रियंका चांदणे, इश्वरी भागवत, चैतन्या आहेर, साईश भागवत आदी प्रयत्नशील होते. सुत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक संतोष मते यांनी केले.

COMMENTS