Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पर्यावरण संवर्धन जनजागृती सायकल महारॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद : मनोहर शिंदे

कराड / प्रतिनिधी : मलकापूर नगर पालिका महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत सन 2021-22 या सालामध्ये माझी वसुंधरा 2.0 हे अभियान

परिवर्तनामध्ये आमच्या महिला आघाडीवर असतील : स्नेहल नायकवडी
पोकलेनचे ऑईल पंप चोरणार चोरटा नाशिक ताब्यात
कराड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड कामगाराचा मुुलगा ठार

कराड / प्रतिनिधी : मलकापूर नगर पालिका महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत सन 2021-22 या सालामध्ये माझी वसुंधरा 2.0 हे अभियान हाती घेतले असून, याअभियानामध्ये आकाश, पृथ्वी, वायू, अग्नि, जमिन या पंच तत्त्वांचे संरक्षण करणेचे दृष्टीने पर्यावरण संवर्धन करणेसाठी विविध उपक्रम हाती घेणेबाबत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सुचित केले आहे. यामध्ये मलकापूर नगरपरिषदेने सहभाग नोंदविला असून विविध विभागांमार्फत पर्यावरण संवर्धनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. याचाच भाग म्हणून मलकापूर शहरातील नागरिकांची पर्यावरणजन जागृती व्हावी या करिता शनिवार, दि.12 रोजी सकाळी ढेबेवाडी फाटा, मलकापूर (पोलिस मदत केंद्रानजीक) येथून सायकल महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, कराड शहर पोलीस निरीक्षक सरोजनी पाटील, पोलिस उपनिरिक्षक, वाहतुक शाखा यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाले. या सायकल महारॅलीस इंद्रजीत चव्हाण, भालचंद्र कुलकर्णी, भगवान मुळीक, मलकापूर पालिकेच्या नगराध्यक्ष सौ. निलम येडगे, रोटरीचे अध्यक्ष अमर जाधव व त्यांचे सहकारी सलिम मुजावर, नगरपरिषदेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन, शिक्षण व विकास समिती सभापती सौ. पुजा चव्हाण, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. गितांजली पाटील, अमर इंगवले, नारायण रैनाक, नगरसेवक, म. न. प., माजी नगरसेवक सागर जाधव व त्यांचे सहकारी, मलकापूर व कराड शहरातील सायकल प्रेमी नागरीक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, नगरपरिषदेचे अधिकारी राजेश काळे, अमित महाडिक, आत्माराम मोहिते, बाजीराव जाधव, सौ. प्रिया तारळेकर, ज्ञानदेव साळुंखे, श्रीमती वैशाली रेके, सौ. सुचिता बलवान, श्रीमती अनिता दोडमणी व कर्मचारी उपस्थित होते. सायकल महारॅली : ढेबेवाडी फाटा – इमर्सन कंपनी – ढेबेवाडी फाटा – कोल्हापूर नाका – संगम हॉटेल – मोहिते हॉस्पिटल – पी. डी. पाटील उद्यान मार्गे बैल बझार रोड – गो.का.क. – लक्ष्मीनगर असा होता.
मलकापूर नगरपरिषदेने माझी वसुंधरा 2.0 अभियानाअंतर्गत शहरामध्ये होणारे प्रदुषण टाळणेसाठी नागरिकांनी विद्युत वाहनांचा वापर करावा यासाठी प्रदर्शन आयोजित केले होते. तसेच शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपन कार्यक्रम हाती घेतला आहे. नागरिकांध्ये स्वच्छतेविषयी व टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनविण्यासाठी प्रबोधनपर प्रदर्शनाचे आयोजन केले होते. याबरोबच प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने शहरातील महिला बचत गटांकडून कापडी पिशव्या शिलाई करुन घेणेबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख ठिकाणी सौदर्यकरण करणेसाठी विविध कलात्मक रचना करणेचे काम हाती घेतलेले आहे.
माझी वसुंधरा 1.0 मध्ये मलकापूर नगरपरिषदेस महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक मिळाला असून, यावर्षी प्रथम क्रमांक मिळविणेचा मानस ठेवलेला आहे. या दृष्टीने लोकसहभागातून विविध उपक्रम हाती घेऊन ते पुर्ण केले आहेत. मलकापूर नगरपरिषदेने आयोजित केलेल्या पर्यावरण संवर्धन जनजागृती सायकल महारॅलीमध्ये सहभागी झालेबद्दल नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले.

COMMENTS