Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहर व तालुका बंद आंदोलनास उस्फुर्त प्रतिसाद

भातकुडगाव फाटा/प्रतिनिधी ः शेवगाव तालुका सकल मराठा समाज सेवा संघाच्या वतीने जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथील मराठा समाजातील

शहरात अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीचे प्रशिक्षण वर्ग सुरू
तरूणाची बसवर दगडफेक ः महिला प्रवाशी जखमी
निरंकारी मिशनच्या वतीने आज वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

भातकुडगाव फाटा/प्रतिनिधी ः शेवगाव तालुका सकल मराठा समाज सेवा संघाच्या वतीने जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकावर झालेल्या अमानुष लाठीचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या शहर व तालुका बंद आंदोलनास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
शहरातील विविध दुकाने,व्यवसायिक प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद आंदोलनात सहभागी झाले. शहरातील मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच महाआरती करून आंदोलनास सुरुवात झाली. सकल मराठा सेवा संघाने पुकारलेल्या या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आदी राजकीय पक्षांसह विविध संस्था संघटनांनी पाठिंबा जाहीर केला. क्रांतीचौकात पार पडलेल्या निषेध सभेत अनेकांनी याबाबत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. दरम्यान सोमवारी,दि.4 सप्टेंबर रोजी सलग तिसर्‍या दिवशी आगारातील बस वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे ग्रामीण परिसरातून शेवगाव तालुक्याच्या गावी येणार्‍या अनेकांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. लागोपाठ तीन दिवस आगारातील बससेवा बंद राहिल्याने आगाराच्या उत्पन्नास जवळपास पंधरा लाख रुपयांचा पेक्षा अधिकचा आर्थिक फटका बसला.

COMMENTS