Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवाशातील वधू-वर परिचय मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद

नेवासा फाटा ः अखिल भारतीय मराठी सोयरिक संस्थेचे संस्थापक प्रा.अशोक कुटे यांच्या प्रयत्नातून जिल्हाभर व जिल्ह्याबाहेर मोफत मेळावे आयोजित केले जाता

देवाला कोंडण्याचे पाप सरकार करीत आहे ; भाजपचा आरोप
महसूलमंत्री ना. थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार पॅटर्न दिशादर्शक – नामदार कदम
डॉ. आंबेडकर पुतळ्यासाठी नगरमध्ये रिपब्लिकन ऐक्य

नेवासा फाटा ः अखिल भारतीय मराठी सोयरिक संस्थेचे संस्थापक प्रा.अशोक कुटे यांच्या प्रयत्नातून जिल्हाभर व जिल्ह्याबाहेर मोफत मेळावे आयोजित केले जातात. त्यांच्या या प्रयत्नातून हजारो मुला मुलींचे विवाह होऊन सुखाचे संसार सुरू आहेत. जीके मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी समर्पण फाउंडेशन चे डॉ. करणसिंह घुले यांचे हस्ते उद्ाटन करण्यात आले. प्रारंभी राजमाता जिजाऊ माता यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. प्रसंगी नानासाहेब दानवे, मराठा पतसंस्थेचे संचालक संभाजीराव मते, मुकिंदपुरच्या उपसरपंच भारतीताई कर्डक, ग्राहक मंचचे कारभारी गरड,अनिता कोतकर, तालुकाध्यक्ष रावसाहेब घुमरे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ घुले म्हणाले की, सध्या समाजामध्ये लग्न जमविणे मोठे आव्हान असुन, मुलींची संख्या लक्षणीय घटत आहे. त्यामुळे अनेक  मुलांना प्रयत्न करूनही मुली मिळणे मुश्किल झाले आहे. जे विवाह जमले त्यामध्ये आलेल्या अडचणींना मध्यस्थीनच त्रास होत असल्याचे चित्र समाजामध्ये पहावयास मिळते. अशोक कुटे यांची विवाह जमविण्याची संकल्पना मराठा समाजासाठी अतिशय लाभदायक असून यामध्ये मुलींनी प्राधान्याने वधु वर सुचक मंडळात संपर्क करून करून घ्यावा. यासाठी आमच्या  मंडळासाठी कुठलाही आर्थिक भार नसून, समाजाच्या दृष्टीने विना मोबदला या ठिकाणी वधू-वरांचे लग्न जमविण्याचे कार्य आम्ही करत आहोत. आज परिणाम च्या संस्थेमार्फत तीन हजारावरून अधिक लग्न जमवलेले आहेत. त्याचबरोबर 80 पेक्षा जास्त वधू वर मेळावे ठीक ठिकाणी घेतलेले आहेत कारण विवाह मंडळामधून जमवलेले लग्न कुठल्याही अडचणी निर्माण होत नाहीत. तसेच विधवा, विदुर, घटस्फोटीत एकल महिलांचे ही लग्न जांवण्याचे आम्ही या ठिकाणी कार्य करतो, आज झालेल्या वधूवर सूचक मेळाव्या मध्ये मुले मुली आणी पालक मोठया संख्येने उपस्थित होते त्यात मुलांची संख्या120 ,आणी मुली फक्त 24 ,संख्येने नोंदणी साठी आले होते,मुलींचा अत्यल्प प्रतिसाद ही मोठी चिंतनीय बाब असल्याचे अशोक कुटे यांनी निदर्शनास आणून दिली याप्रसंगी, विजय चौधरी, आदेश साठे, अशोक लंघे, अंजना पठारे, रेणुका चौधरी, कोलते, सोमनाथ गायकवाड, सुनील शिंदें, यांचेसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विवस्थापक पूजा पवार, सोनाली वाघ, रवी निकम, श्रध्दा कोळसे, यांनी परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांना मराठा सोयरीक संस्थेच्या गंगापूर येथील मेळाव्यासाठी जास्तीतजास्त मुले, मुलीनि उपस्थित राहण्याचे अवाहन प्रा, नानासाहेब दानवे यांनी व रावसाहेब घमरे यांनी केले व सर्वांचे आभार मानले.

COMMENTS